घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना ऐश्वर्या राय परदेशात, फक्त अभिषेक बच्चनच नाहीतर, लेक आराध्या देखील नाही सोबत, अभिनेत्रीचा समोर आलेला फोटो थक्क करणारा, (reaching)सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या राय हिची चर्चाबॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्या सिनेमांमुळे आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय हिच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी आल्याची चर्चा जोर धरत आहे. शिवाय ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं आहे अशी चर्चा देखील सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये रंगत आहे. पण रंगणाऱ्या घटस्फोटाच्या चर्चांवर ऐश्वर्या अभिषेक आणि दोघांच्या कुटुंबियांनी अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. दरम्यान, अभिषेक याने घटस्फोटासंबंधी एका पोस्ट सोशल मीडियावर लाईक केली होती. त्यामुळे देखील अनेक चर्चा रंगल्या.
घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना, ऐश्वर्या राय हिचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अभिनेत्री परदेशात सुट्ट्यांचा आनंद लुटना दिसत आहे. पण यावेळी ऐश्वर्या हिच्यासोबत पती अभिषेक बच्चन आणि लेक आराध्या बच्चन दिसत नसल्यामुळे पुन्हा चर्चांना (reaching)उधाण आलं आहे. ऐश्वर्या हिचा व्हायरल होत असलेला फोटो न्यूयॉर्क येथील एका हॉटेलमधील आहे. सध्या अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्क येथील एका चाहतीने ऐश्वर्या हिच्यासोबत एक फोटो पोस्ट केला आहे. फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ऐश्वर्या हिला दुसऱ्यांदा भेटल्यामुळे चाहती आनंदी दिसत आहे. ऐश्वर्याच्या चाहतीने काही वर्षांपूर्वीचा फोटो देखील पोस्ट केला आहे.फोटोवर नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एक नेटकरी केमेंट करत म्हणाला, (reaching)बॉलिवूडमध्ये पुन्हा दमदार पदार्पण करशील अशी आशा आहे, ती अनेक गोष्टींसाठी पात्र आहे दुसरा नेटकरी म्हणाला, ‘या वयात देखील ऐश्वर्या प्रचंड सुंदर दिसते ऐश्वर्या कायम तिच्या सौंदर्यामुळे देखील चर्चेत असते
काही दिवसांपूर्वी अनंत अंबानी यांच्या लग्नात देखील ऐश्वर्या एकटी लेक आराध्या हिच्यासोबत पोहोचली तर, अभिषेक पूर्ण बच्चन कुटुंबासोबत पोहोचला. तेव्हा देखील ऐश्वर्या अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला. पण लग्नाचे इनसाईड फोटो समोर आल्यानंतर अभिषेक ऐश्वर्या एकत्र दिसले. गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंब आणि ऐश्वर्या – अभिषेक यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.
हेही वाचा :
कोल्हापुरात चिखल, दुर्गंधीचा पूर: कचरा आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांची परिस्थिती गंभीर
स्किपिंग: फिटनेसची सोपी आणि प्रभावी कसरत
मनूचे ऐतिहासिक दुसरे कांस्यपदक सरबज्योतसह मिश्र सांघिक गटात यश