वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर(political) सध्या आरक्षण बचाव यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रात मराठा व ओबीसी आरक्षणाचा प्रश्न तापला असून, यामुळे दोन जातींमध्ये ताण निर्माण होत आहे.
यावरून प्रकाश आंबेडकरांनी राज्यातील जनतेला आवाहन केले आहे की त्यांनी या राजकारणाला बळी पडू नये.
आंबेडकरांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना आरक्षणाविषयीची त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले आहे. विशेषत: मराठा आरक्षणप्रश्नी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील त्या भूमिकेचे समर्थन करण्याचे वक्तव्य केले होते. यावर प्रतिक्रिया देताना आंबेडकर म्हणाले, “मुळात प्रश्न असा आहे की तुमच्या (शरद पवार) पक्षाची भूमिका काय आहे? मराठा आरक्षणाबाबत तुमच्या पक्षाने कोणती भूमिका घेतली आहे ते आधी जाहीर झाले पाहिजे. प्रत्येक पक्षाने आरक्षणावर कोणती भूमिका घेतली आहे ते स्पष्ट सांगावे. स्वतःची भूमिका जाहीर न करता मुख्यमंत्र्यांनी भूमिका घ्यावी असे तुम्ही म्हणत असाल, तर तुमचा पक्ष गुंडाळून टाका, तुमच्या पक्षाची गरज नाही.”
आंबेडकरांच्या या विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, आगामी काळात यावर काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
“जातीवरून देशविभाजनाचा काँग्रेसचा प्रयत्न” – किरेन रिजीजू यांची घणाघाती टीका
प्रकाश आंबेडकरांचा सल्ला: “तर तुमचा पक्ष गुंडाळून टाका” – शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना खडे बोल