स्टेजवर राष्ट्राध्यक्षांचा मंत्र्यांबरोबर पॅशनेट Kiss! नव्या वादाला फुटलं तोंड

सध्या फ्रान्समध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमधील खेळांबरोबरच(Ministers) खेळाशिवायच्या गोष्टीही चांगल्याच चर्चेत आहेत. मैदानाबाहेर घडणाऱ्या अनेक घडामोडी अगदी क्रीडाप्रेमांपासून प्रसारमाध्यमांपर्यंत सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरत असताना असाच काहीसा प्रकार फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासंदर्भात घडला आहे.

मॅक्रॉन यांनी फ्रान्सच्या क्रीडामंत्री(Ministers) एमिली ऑडिया कास्टेरा यांच्याबरोबर केलेलं एक वर्तनावरुन वादाची ठिणगी पडली आहे. मॅक्रॉन यांनी 26 जुलै रोजी झालेल्या ऑलिम्पिकच्या ओपनिंग सेरिमनीमध्ये 46 वर्षीय एमिली यांना घट्ट मिठी मारत एकमेकांच्या गालांचं चुंबन घेतलं होतं. मात्र आता हा फोटो जगभरामध्ये प्रचंड व्हायरल झाल्यानंतर वादाला तोंड फुटलं आहे.

एमिली आणि मॅक्रॉन एकमेकांची गळाभेट घेऊन चुंबन घेत असतानाच फ्रान्सचे 34 वर्षीय पंतप्रधान गॅब्रिअल अटल दुसऱ्या बाजूला बघत असल्याचं फोटोत दिसत आहे. या दोन्ही उच्चपदस्थ नेत्यांचं सार्वजनिक मंचावरील हे वागणं अनेकांना खटकलं आहे. फ्रान्समध्ये पाश्चिमात्य देशाप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी एकमेकांचे चुंबन घेणे किंवा मिठी मारणे ही सामान्य बाब आहे. मात्र ज्या पद्धतीने एमिली आणि मॅक्रॉन यांनी अगदी उत्फुर्तपणे एकमेकांना आलिंगन देत चुंबन घेतलं हे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. सोशल मीडियावर अनेकांनी यासंदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

“गॅब्रिअल अटल मुद्दाम त्यांचं लक्ष दुसरीकडे असल्याचं भासवत आहेत. आपण नेमकं काय करावं हे त्यांना कळत नाहीये,” असं एकाने हा फोटो पाहून म्हटलं आहे. “मी माझ्या जोडीदाराला अशाप्रकारे किस करतो. हे लज्जास्पद आहे,” असं अन्य एकाने म्हटलं आहे. “राष्ट्राध्यक्ष आणि मंत्र्याने एकमेकांबरोबर हे असं वागणं योग्य नाही,” असं मत अन्य एकाने नोंदवलं आहे. हे चुंबन अनेकांना फारच पॅशनेट वाटलं आहे. फ्रान्समध्ये सामान्यपणे गालाला गाल लावून अभिवादन करण्याची पद्धत आहे. मात्र ज्या प्रकारे राष्ट्राध्यक्ष आणि महिला मंत्र्याने एकमेकांना पकडलं आहे ते पाहून काहींनी भलतीच शंकांही उपस्थित केली आहे.

मॅक्रॉन आणि एमिली यांचा हा फोटो फ्रान्समधील ‘मॅडम फिगारो’ नावाच्या मासिकाने मुखपृष्ठावर छापल्याने चर्चेत आला आहे. हे चुंबन फारच विचित्र आहे. मात्र एमिली यांचा इतिहास अशा प्रकारच्या घटनांमधून स्वत:कडे लक्ष वेधून घेण्याचा असल्याचं मासिकेने म्हटलं आहे.

दरम्यान, यंदाची ऑलिम्पिक ओपनिंग सेरीमनी चांगलीच चर्चेत राहिली. पहिल्यांदाच कोणत्याही मैदानात उद्घाटन न होता पॅरिसमधील सिरेन नदीवर 85 बोटींमधून 7500 स्पर्धक सहा किलोमीटरच्या प्रदीर्घ रॅलीमध्ये सहभागी होत स्पर्धेत सहभागी झाले.

हेही वाचा :

दहावी पास तरुणांसाठी थेट सरकारी नोकरीची संधी…

कोल्हापूरचे लोक प्रतिनिधी विकासाचा विचार करणार कधी

विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार-शिंदे गटात जुंपली