ना बच्चन, ना खान, जर सगळं काही ठीक असतं तर ऐश्वर्या झाली असती ‘या’ कुटुंबाची सून

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चनच्या नात्याविषयी वेगवेगळ्या चर्चा(family) सुरु असतात. अनेक रिपोर्ट्सनुसार, असा दावा करण्यात आला आहे की ऐश्वर्याचं अभिषेक आणि अर्थातच बच्चन कुटुंबासोबत पटत नाही आहे. ऐश्वर्या नेहमीच तिची लेक आराध्यासोबत कार्यक्रमांमध्ये दिसते. त्याच्यांसोबत ना अभिषेक बच्चन ना बच्चन कुटुंब दिसत. त्यामुळे ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबात नक्की काय सुरु आहे हे सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे. या आधी ते दोघं इंडस्ट्रीतील बेस्ट कपल म्हटले जात होते. बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी 2007 मध्ये लग्न केलं.

ऐश्वर्या रायनं अभिषेकच्या लग्नाच्या प्रपोजलला एक्सेप्ट (family)करण्याआधी बॉलिवूडच्या दोन मोठ्या कलाकाराला डेट केलं होतं. जर सगळं काही ठीक असतं तर ऐश्वर्या कधीच बच्चन कुटुंबाची सून झाली नसती. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायनं 2000 मध्ये ‘ढाई अक्षर प्रेम के’ मध्ये पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. तेव्हा ऐश्वर्या सलमान खानसोहत रिलेशनशिपमध्ये होती.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनची लव्ह स्टोरी ‘धूम 2’ च्या सेटवर सुरु झाली. त्यानंतर दोघांनी उमराव जानमध्ये एकत्र काम केलं. त्यानंतर जेव्हा ऐश्वर्या जोधा अकबर या चित्रपटाचं शूटिंग करत होती तेव्हा ऐश्वर्याला अभिषेकनं प्रपोज केलं आणि त्यानंतर त्यांनी सप्तपदी घेतल्या.

अभिषेक बच्चन आधी ऐश्वर्या राय ही विवेक ओबेरॉयसोबत रिलेशनशिपमध्ये होती. 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘क्यों! हो गया ना’ या चित्रपटात विवेक ओबेरॉयसोबत काम केलं. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली. पण ऐश्वर्या राय बच्चनच्या एक्स बॉयफ्रेंड म्हणजेच सलमान खानला ते आवडलं नाही.

विवेक ओबेरॉयनं नुकत्याच ब्रुट इंडियाला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की सलमान खानसोबत त्याचे संबंध बिघडल्यानं त्याला चित्रपटसृष्टीत काम मिळत नव्हतं. जर ऐश्वर्या आणि विवेकमध्ये सलमान खान आला नसता आणि दोघांमध्ये सगळं ठीक राहिलं असतं तर ऐश्वर्या ओबेरॉय फॅमिलीची सून झाली असती.

ऐश्वर्या राय आणि सलमान खानची लव्ह स्टोरी 90 च्या दशकांमध्ये खूप चर्चेत होती. 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातून दोघांमधील जवळीकता वाढली. दोघांना एकमेकांवर असलेल्या प्रेमाची जाणीव झाली. पण काळातच त्या दोघांमध्ये भांडणं होऊ लागली होती.

सलमान खान आणि ऐश्वर्या रायचा ब्रेक देखील चांगलाच चर्चेत राहिला आहे. एकदिवस सलमान खान दारू पिऊन घरी गेला. ऐश्वर्याला त्याच्याशी लग्न कर असं म्हणाला. या दरम्यान, दोघांमध्ये वाद झाला. टाइम्स नाउच्या रिपोर्ट्सनुसार, सलमाननं ऐश्वर्याचं मानसिक आणि शारीरिक शोषण केलं. सलमान नशेत होता. त्यानंतर दोघांनी कधीच एकत्र काम केलं आणि नागी कोणत्या कार्यक्रमात एकत्र दिसले.

हेही वाचा :

रश्मिका मंदानासोबत विक्की कौशलचा रॅम्प वॉक, व्हिडीओ व्हायरल

इचलकरंजीतील CCTV कॅमेरे बंद; प्रशासनाचे दुर्लक्ष आणि गुन्ह्यांच्या वाढत्या प्रकरणांवर चिंता

शहरातील मुख्य रहदारीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती, कमी गरज असलेल्या भागात विनाकारण तैनातीवर नागरिक आक्रमक