आगामी विधानसभा निवडणुकीच्या(election) पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी टोल नाक्यावर टोलमाफीचे आंदोलन केले आहे, परंतु भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी हे आंदोलन राजकीय स्टंट असल्याचे ठामपणे सांगितले आहे. त्यांच्या मते, पाटील यांनी सहानुभूती मिळवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.
धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत सतेज पाटील यांच्यावर टीका करताना त्यांना “टोलमाफिया” असे संबोधले. त्यांनी असेही म्हटले की, सतेज पाटील यांना टोल प्रश्नी आंदोलन करण्याचा अधिकार नाही, कारण त्यांनी स्वतः टोल आकारणीची पावती केली होती. त्यांच्या मते, सतेज पाटील यांनी टोलनाक्यावर आंदोलन करून नकारात्मक कथानक रचण्याचा प्रयत्न केला आहे.
महाडिक यांनी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर असेही स्पष्ट केले की, भाजप-शिवसेना सरकारने रस्ते करणाऱ्या कंपनीचे पैसे अदा करून कोल्हापूरकरांना टोल माफी दिली होती. ते म्हणाले की, रस्ते खराब असल्यास टोल आकारणी करू नये या भूमिकेशी ते सहमत आहेत.
हेही वाचा :
मुंबई इंडियन्स हार्दिक पंड्याला मेगा ऑक्शनपूर्वी सोडणार? ‘या’ चार खेळाडूंना ठेवणार कायम
महाराष्ट्रात पावसाचा कहर, हवामान खात्याने उद्याही रेड अलर्ट जारी
कोल्हापूर : नृसिंहवाडी-औरवाड पूल नागरिकांच्या योगदानातून साकारणार