शेतकऱ्यांना दिलासा! पिकांच्या नुकसानीपोटी मिळणार 596 कोटी रुपये

अवकाळी पावसामुळं राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं(farmers) नुकसान झालं होतं. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारनं 596 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, कोणत्या विभागात किती नुकसान झालं आहे? आणि किती मदत मिळणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.

विविध संकटामुळं बळीराजा सातत्यानं चिंतेत आहे. कधी आस्मानी संकट(farmers) येतं. तर कधी सुलतानी संकट येत. कधी दुष्काळ असतो तर कधी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. परिणामी हाती आलेली पिकं वाया जातात. यावर्षी राज्यात अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळाला होता. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला होता. शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली होती. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला होता. यामुळं सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 596 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, नाशिक विभागात 37 हजार 422 हेक्टरवरीला पिकांना फटका बसला होता. 73 हजार 567 शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे. या शेतकऱ्यांना नुकसानीपोटी सरकारनं 108 कोटी 21 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तर अमरावती विभागातील शेतकऱ्यांसाठी 382 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. अमरावती विभागातील 21 हजार 362 शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.

या विभागात 1 लाख 38 हजार 253 हेक्टरवरील पिकांना फटका बसला होता. तर नागपूर विभागात 3 लाख 54 हजार 756 शेतखऱ्यांच्या 2 लाख 17 हजार 690 हेक्टरवरील पिकांना फटका बसला होता. यासाठी सरकारनं 100 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तर पुणे विभागात 2 हजार 297 शेतकऱ्यांचे 1 हजार 657 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना 5 कोटी 83 लाखांची मदत जाहीर झालीय. दरम्यान, नागपूर आणि अमरावती विभागातील शेतकऱ्यांना 482 कोटी रुपयांची मदत जाहीर झालीय. ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी मिळालेल्या निधीतून बँकांनी पीक कर्जाची वसुली करु नये असे निर्देश देखील राज्य सरकारनं दिले आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा :

मुंबई इंडियन्स हार्दिक पंड्याला मेगा ऑक्शनपूर्वी सोडणार? ‘या’ चार खेळाडूंना ठेवणार कायम

महाराष्ट्रात पावसाचा कहर, हवामान खात्याने उद्याही रेड अलर्ट जारी

कोल्हापूर : नृसिंहवाडी-औरवाड पूल नागरिकांच्या योगदानातून साकारणार