मुख्याध्यापिका अन् सहाय्यक शिक्षिकेत फ्री स्टाईल हाणामारी Video Viral

बिहारमधील पटना येथील एका शाळेतील दोन शिक्षिकेच्या मारहाणीचा व्हिडिओ(Video) सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. येथील एक मुख्याध्यापिका आणि दुसरी सहाय्यक शिक्षिका दोघींनीही एकमेकींनी चांगलाच चोप दिलाय.

वर्गातून बाहेर येत थेट शेतात जाईपर्यंत एकमेकांना मारहाण(Video) करताना या दोन्ही शिक्षिका दिसत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठा व्हायरल झाला आहे.

ही घटना पटना येथील बिहटा प्रखंड येथील एका विद्यालयातील असून तेथील मुख्याध्यापिका आणि सहाय्यक शिक्षिका यांच्यामध्ये वाद होता. त्यांच्यामध्ये एका गोष्टीवरून क्लासरूममध्ये वाद पेटला आणि शाळेतील विद्यार्थ्यांसमोरच त्यांनी एकमेकांना मारायला सुरूवात केली. यामध्ये एका शिक्षिकेची आईसुद्धा दुसऱ्या शिक्षिकेला चप्पलेने मारहाण करताना दिसत आहे.

हेही वाचा :

शेतकऱ्यांना दिलासा! पिकांच्या नुकसानीपोटी मिळणार 596 कोटी रुपये

सतेज पाटील यांचे टोल आंदोलन राजकीय फायद्यासाठीच: धनंजय महाडिक यांची जोरदार टीका

मुंबई इंडियन्स हार्दिक पंड्याला मेगा ऑक्शनपूर्वी सोडणार? ‘या’ चार खेळाडूंना ठेवणार कायम