‘मी रिटायर होतोय’; आमिर खाननं चित्रपटसृष्टीपासून केलं स्वत: ला दूर

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खाननं ‘महाराज’ या चित्रपटातून(film industry) अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. हा चित्रपट नेटफ्लिक या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. तर जुनैदनं केलेल्या कामाची सगळीकडे स्तुती होत आहे. जुनैदनं नुकतंच सांगितलं की आमिर खान हा रिटायरमेंटच्या काळातून जात होता आणि त्यानं त्यानं ‘आमिर खान प्रोडक्शंस’ सांभाळण्याची जबाबदारी दिली. जुनैद आता या प्रोडक्शन हाऊसकडून बनवण्यात येणारा चित्रपट फिल्म ‘प्रीतम प्यार’ ची निर्मिती करत आहे.

आमिर खानचा मुलगा जुनैद खानशी त्याच्या अभिनयाच्या(film industry) करिअरच्या सुरुवातीलाच प्रोडक्शनमध्ये नशिब आजमावण्याच्या निर्णयाविषयी विचारण्यात आलं. त्यावेळी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की हो, मी असं केलं. मी चित्रपटाच्या सेटवर आणि पीकेच्या सेटवर कॅमेऱ्याच्या मागे राहिलो आहे. मी जाहिरातीचं शूट करण्यासाठी देखील मदत केली आहे.

‘महाराज’ ची शूटिंग पूर्ण केल्यानंतर, आम्ही ‘एकेपी’ (आमिर खान प्रोडक्शन्स) मध्ये एका चित्रपटात काम करत होते. यावेळी किरण राव ‘लापता लेडीज’ हा चित्रपट बनवत होती आणि वडील त्यावर मी रिटायर होणार या काळातून जात होते आणि आम्ही त्याविषयी चर्चा देखील केली होती. त्यांनी मला सांगितलं की मी रिटायर होणार आहे.

त्यांच्यात काय बोलणं झालं याविषयी सांगत जुनैद पुढे म्हणाला, मी रिटायर होतोय, तर तू का नाही सांभाळत. तर हा तो काळ होता जेव्हा मी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. मला वाटतं की मला प्रोडक्शनची खूप चांगली समज आहे. मला वाटतं की चित्रपटाच्या निर्मितीमध्ये हे सगळ्यात कठीण काम आहे.

जुनैदला पुढे विचारण्यात आलं की आमिर आणि रीना दत्तला त्याच्या पदार्पणाविषयी चिंता होती का? त्यावर उत्तर देत जुनैद हसला आणि म्हणाला ‘खरंतर, नाही. ते चिंतित नव्हते, त्यांना माझ्यासाठी आनंद होत होता. चिंता करणाऱ्या लोकांमध्ये ते नाही. कारण इतकी वर्ष ते या इंडस्ट्रीमध्ये राहिले आहेत त्यामुळे त्यांनी हे सगळं पाहिलं आहे. हे सत्य आहे की ते चिंतेत नव्हते, त्यामुळे मला चित्रपटासंबंधीत प्रत्येक गोष्टीतून मदत मिळाली. त्या दोघांना हे खूप आवडलं. वडिलांनी हे आवडलं. ते एक सर्वसामान्य प्रेक्षक आहेत, कारण ते काही पाहायला जातात तेव्हा त्यांना त्या गोष्टीचा आनंद घ्यायचा असतो. माझी आई खूप विचार करणाऱ्या प्रेक्षकांपैकी एक आहे.’

जुनैदनं हे देखील सांगितलं की आमिर खान त्याच्या सेटवर कधीच आला नाही आणि नाही त्यानं त्याच्या डेब्यू फिल्ममध्ये काही हस्तक्षेप केला. जुनैदनं सांगितलं की ‘ते कधीच आमच्या सेटवर आले नाही. ते फक्त शूटिंगच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये माझ्या तीन आजी-आजोबांसोबत आले होते आणि त्यानंतर त्यांनी सरळ चित्रपट पाहिला.’

हेही वाचा :

इचलकरंजी: खड्डे च खड्डे! पावसाळा संपला, पण मक्तेदार कुठे गायब?

बच्चू कडू आयत्या पिठावर नागोबा, नेत्यांना शिव्या देतो, खोड्या करतो; रवि राणांनी डिवचलं

यंत्रमागधारकांच्या विज बिलात अतिरिक्त सवलतीची अंमलबजावणी न झाल्याने लोकप्रतिनिधींच्या घरावर मोर्चा: विनय महाजन