रणबीरची EX आलियाला रात्री २ वाजता करायची मेसेज, नंतर झाला पश्चाताप!

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि कतरिना कैफ या एकमेकांच्या चांगल्या मैत्रीणी(Entertainement) आहेत. त्यांची मैत्री खूप जुनी आहे. अनेकदा दोघी एकत्र जिममध्येही जातात. दोघी लवकरच एका चित्रपटात एकत्र दिसणार असल्याची चर्चा आहे. एकदा कतरिनाने रात्री २-३ च्या सुमारास आलियाला मेसेज केला होता. असं एका मुलाखतीत आलियाने सांगितलेले. काय होता तो मेसेज जाणून घेऊ….

आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांनी व्होग बीएफएफ शोच्या(Entertainement) एका एपिसोडमध्ये भाग घेतला होता. दोघींनी एकसारखे कपडे घातलेले. ज्यासाठी नेहा धुपियाने दादही दिलेली. या मुलाखतीत कतरिना कैफने सांगितले की, तिने रात्री उशिरा आलिया भट्टला इंस्टाग्रामशी संबंधित प्रश्न विचारायला मेसेज केला होता.

कतरिना कैफ म्हणाली होती की, माझं इन्स्टाग्राम बिघडलं तर आलियाच त्याचा उपाय आहे. मध्यरात्री २-३ वाजण्याच्या सुमारास मी तिला मेसेज करून विचारले होते की, माझा फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड होत नाही, मग मी काय करू? त्यानंतर आलिया भट्ट म्हणाली की, तो फोटो छोटा करावा लागेल. यानंतर कतरिनाने आलिया जसं सांगतेय तसं केलं पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

कतरिना कैफ पुढे म्हणाली, ‘मला नंतर समजले की रात्रीचे २ वाजले आहेत आणि हा प्रश्न विचारण्याची ही योग्य वेळ नाही.’ हे ऐकून सगळे हसले. आलिया भट्टने रणबीर कपूरसोबत लग्न केले. पण रणबीर कपूर आधी कतरिना कैफला डेट करत होता. त्यांचे ब्रेकअप झाले असले तरी ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. शिवाय अभिनेत्री कतरिना कैफ विकी कौशल सोबत लग्न करुन खूप सुखी आहे. लवकरच आलिया, रणबीर आणि विकी कौशल एकत्र एका सिनेमात दिसणार आहे.

हेही वाचा :

इचलकरंजी: खड्डे च खड्डे! पावसाळा संपला, पण मक्तेदार कुठे गायब?

बच्चू कडू आयत्या पिठावर नागोबा, नेत्यांना शिव्या देतो, खोड्या करतो; रवि राणांनी डिवचलं

यंत्रमागधारकांच्या विज बिलात अतिरिक्त सवलतीची अंमलबजावणी न झाल्याने लोकप्रतिनिधींच्या घरावर मोर्चा: विनय महाजन