राज्यात ‘माझी लाडकी बहीण योजना’वरून (Yojana)सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. विरोधकांनी योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडेल असा दावा केला आहे आणि याचिकाही दाखल केली आहे. मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळली असून, योजनेला कल्याणकारी योजना मानले आहे.
यावेळी अजित पवारांनी एक्सवर पोस्ट शेअर करत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी आगामी काळात योजनेची (Yojana) रक्कम वाढवण्याचे संकेत दिले आहेत. “माझी लाडकी बहीण योजनेला अधिक बळकटी देवून रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करेन. ही निवडणूक महिलांच्या हितासाठी आणि विरोधात असणाऱ्यांमध्ये आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवारांनी विरोधकांवर आरोप करत म्हटले की, “विरोधकांना या कल्याणकारी योजनेला बंद पाडायचे आहे. अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे. या योजनेला यशस्वीपणे राबवण्याची आपली खोटी भाकिते विरोधक करत आहेत.”
हेही वाचा :
आजचे राशी भविष्य (06-08-2024)
मोबाईलचं नेटवर्क गेल्यास मिळणार भरपाई; टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले
वरुणराजा पावला! राज्यातील अनेक धरणं काठोकाठ भरली; कोणत्या धरणात किती टक्के पाणीसाठा? जाणून घ्या…