कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी : शेजारच्या बांग्ला देशात आरक्षणाच्या प्रश्नावरून(political news) उठलेल्या वादळात शेख हसीना यांची सत्ता उडून गेली आहे. त्यांना देशातून भारतात पलायन करावे लागले आहे. आरक्षण प्रश्नातून महाराष्ट्राचा ही मणिपूर होईल अशी शरद पवार यांनी व्यक्त केलेली भीती, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही असे वादग्रस्त विधान करून मराठा समाजासह सर्वत्र समाज घटकांचा रोष उडवून घेतला आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक तर त्यांच्याविरुद्ध फारच आक्रमक(political news) झाले आहेत. त्यांचे “बोलाविता धनी”देवेंद्र फडणवीस चा आहेत असे बोलले जाऊ लागले आहे. विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याच्या तयारीत असलेल्या, तशी पूर्वतयारी करत असलेल्या राज ठाकरे यांनी आरक्षणाची गरजच नाही असे विधान करण्यामागे त्यांचा नेमका हेतू काय आहे हा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.
पूर्व दिशा ठरवायची आणि वाटचाल पश्चिमेकडे करायचे असे शरद पवार यांचे राजकारण आहे आणि असते. गेल्या काही वर्षांपासून मनसेच्या राज ठाकरे यांचेही राजकारण असेच अनाकलनीय बनले आहे. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करायची. आरक्षण काय मिळणार नाही हे सांगायचे. आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात आले पाहिजे ही बाळासाहेब ठाकरे यांची मूळ भूमिका मांडत राहायचे. आणि आता महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीय लोकांच्यावर केला जाणारा खर्च थांबवला तर महाराष्ट्रात आरक्षणाची गरज असणार नाही.
महाराष्ट्रात सर्व काही मुबलक आहे असं सर्वसामान्य माणसाला कोड्यात टाकणार लॉजिक राज ठाकरे महाराष्ट्रासमोर मांडतात. राज ठाकरे यांची मनसे विधानसभा निवडणुकीत 250 जागांवर आपले उमेदवार देणार आहे. म्हणजे ते आगामी विधानसभा निवडणुकीत”स्वबळ” आजमावणार आहेत. अशावेळी सर्व समाज आपल्या बाजूने कसा उभा राहील यावर त्यांचा फोकस असला पाहिजे पण महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही असे वादग्रस्त विधान करून त्यांनी आरक्षणाचा प्रत्यक्ष लाभ घेणाऱ्या सर्व घटकांना आणि आरक्षणासाठी आरपारची लढाई करणाऱ्या मराठा समाजाला अंगावर घेतले आहे. त्यांचा रोष ओढवून घेतला आहे.
निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या राज ठाकरे यांनी “आ, बैल मुझे मार”अशी स्वतःची अवस्था करून घेतली आहे. हे त्यांनी मुद्दाम ठरवून केले आहे की बोलण्याच्या ओघात घडले आहे हे कळायला मार्ग नाही. आपल्या विधानावर महाराष्ट्रातून कोणत्या प्रतिक्रिया येतात हे जाणून घेण्याचा त्यांचा कदाचित हा प्रयत्न असावा.
राज ठाकरे हे भाजपच्या जवळ आहेत, लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपला(political news) विनाअट पाठिंबा दिला होता आणि त्यानंतर त्यांनी खुलासा केला होता की माझा पाठिंबा नरेंद्र मोदी यांना आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी फडणवीस अधून मधून जातात तर फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी राज ठाकरे अधून मधून जात येत असतात. त्यामुळेच आरक्षण या विषयावर वादग्रस्त भूमिका घेणाऱ्या राज ठाकरे यांचे बोलावीते धनी फडणवीस आहेत असे आता उघडपणे बोलले जाऊ लागले आहे.
महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही असे विधान त्यांनी सोलापुरात केले. त्यानंतर ते धाराशिवला गेले. तेथे राज ठाकरे यांचे वास्तव्य असलेल्या हॉटेलमध्ये मराठा समाजाचे संतप्त कार्यकर्ते घुसले. तेथे त्यांनी निषेध अशा घोषणा दिल्या. पोलिसांनी परिस्थिती कौशल्यांनी हाताळली. आर्थिक निकषावर आरक्षण दिले पाहिजे अशी मागणी काही महिन्यापूर्वी त्यांनी केली होती. पण अशी भूमिका घेणारे ते काही पहिले नेते नव्हेत. बाळासाहेब ठाकरे हे हीच भूमिका जाहीरपणे मांडायचे. त्यानंतर विलासराव देशमुख यांनी अशीच भूमिका गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत मांडली होती.
जात हा निकष आरक्षणासाठी लावता कामा नये अशी भूमिका घेणारे देशमुख हे सत्ता वर्तुळातले होते. तेव्हा त्यांचा कोणी निषेध वगैरे केला नाही. पण आता आरक्षण हा विषयच अति संवेदनशील बनला असल्याने त्यावरच्या प्रतिक्रिया पटकन येत असतात. आरक्षणाची गरजच काय असं विधान करणारे राज ठाकरे हे आता टीकेचे धनी बनले आहेत. त्यांनी आरक्षणाचे उत्तर शोधलेला एक नवा”राज”मार्ग त्यांना कोणत्या स्टेशन पर्यंत घेऊन जाणार आहे हे आत्ताच सांगता येणार नाही.
हेही वाचा :
मोबाईलचं नेटवर्क गेल्यास मिळणार भरपाई; टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले
‘लाडकी बहीण योजने’ची रक्कम वाढणार? अजित पवारांनी दिले संकेत
खांदा निसटला, बोट मोडलं; 12 सेकंदात पदक गमवलं पण पोरगी वाघासारखी लढली! Video