नवी दिल्ली: बांगलादेशात सुरू असलेल्या ताज्या संघर्षावर केंद्र सरकार अॅक्शन मोडवर(headache) आले आहे. केंद्र सरकारने बांगलादेशातील संघर्षावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षील बैठक बोलवली आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदीं, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, टीएमसी नेते सुदीप बंदोपाध्याय, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव या बैठकीला उपस्थित आहेत.
हिंसाचारानंतर बांगलादेशात लष्कराने सत्ता ताब्यात(headache) घेतली आहे. तेथील लष्करप्रमुखांनी अंतरिम सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या अंतरिम सरकारमध्ये शेख हसीना यांचा पक्ष आवामी लीगचा समावेश होणार नसल्याचे वृत्त आहे. बांगलादेश नॅशनल पार्टी आणि जमात-ए-इस्लामी हे दोन पक्ष सरकारमध्ये सामील होणार आहेत. हे दोन्हीही पक्ष भारताविरुद्ध विष कालवण्याची एकही संधी सोडत नाहीत.
जमात-ए-इस्लामीचे पाकिस्तानशी असलेले कनेक्शन सर्वश्रुत आहे. त्याचबरोबर बांगलादेश नॅशनल पार्टीने संधी मिळेल तेव्हा भारतविरोधी कारवाया करण्याची संधी सोडलेली नाही. शेख हसीना यांनी पंतप्रधान असताना भारतविरोधी शक्तींना रोखून धरले होते. पण आता परिस्थिती कशी असेल हे सांगता येत नाही. भारतविरोधी शक्ती बांगलादेशचा वापर दहशतवादी कारवायांसाठी तर करत नाहीत ना, अशीही शंका उपस्थित केली जात आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील सीमा सुमारे 4000 किमी लांब आहे. जोपर्यंत शेख हसीना बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या, तोपर्यंत भारत सीमेच्या सुरक्षेबाबत निश्चिंत होता. यावेळी त्यांनी देशातील विकास आणि आर्थिक प्रगतीवर लक्ष केंद्रित केले. मात्र परिस्थिती बदलल्यानंतर आता सीमेबाबत खबरदारी वाढवावी लागणार आहे. विशेषत: ड्रग्ज, मानवी तस्करी आणि बनावट चलनाचा धोका येथे सतत दिसून येतो. बांगलादेशचे नवे सरकार या गोष्टी कशा हाताळते याची भारताला चिंता असेल.
दरम्यान, बांगलादेशातील सत्तापालटानंतर बांगलादेशचे अध्यक्ष शहाबुद्दीन यांनी संसद बरखास्त करण्याची घोषणा केली आहे. तसेच माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. अनेक खटल्यांमध्ये दोषी ठरल्यानंतर खालिदा नजरकैदेत आहेत. बांगलादेशच्या राष्ट्रपतींनीही अंतरिम सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे. आणि शेख हसीना यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामाही स्वीकारण्यात आला आहे.
बांगलादेशातील परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. शेरपूर कारागृहावर हल्लेखोरांनी हल्ला केला आहे. हल्ल्यानंतर शेरपूर कारागृहातून 518 कैदी फरार झाले आहेत. प्रतिबंधित जमात-उल-मुजाहिद्दीनचे अनेक दहशतवादीही पळून गेले आहेत. बांगलादेशमध्ये आज कर्फ्यू संपला आहे. आजपासून सर्व शाळा आणि बाजारपेठा सुरू होणार आहेत. बांगलादेशात सकाळी ६ वाजता कर्फ्यू हटवण्यात आला आहे.
हेही वाचा :
आरक्षणाची गरजच नाही ठाकरेंचा नवा “राज” मार्ग!
महागाईतून सर्वसामान्यांना दिलासा! वर्षभरानंतर डाळींच्या दरात घरसण
“हुकूमशाही करणाऱ्यांना जनतेची माफी नाही”; बांग्लादेशचा उल्लेख करत राऊतांचा सरकारला टोला