हरियाणाचे माजी मुख्यमंत्री (minister) आणि काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी विधान केले की, “विनेश फोगाटला राज्यसभेवर पाठवण्याची आमची इच्छा आहे. पण आमचे केवळ 28 आमदार आहेत. या संख्येच्या जोरावर आमचा उमेदवार राज्यसभेचा खासदार होऊ शकत नाही. जर आमची आमदार संख्या जास्त असती तर आम्ही तिला राज्यसभा खासदार केले असते.” या विधानावर विनेश फोगाटचे काका महावीर फोगाट चांगले भडकले आहेत आणि त्यांनी भूपेंद्र हुड्डा यांचा समाचार घेतला आहे.
भूपेंद्र हुड्डा यांच्यावर भेदभावाचा आरोप
महावीर फोगाट यांनी प्रतिक्रिया देत भूपेंद्र हुड्डा यांच्यावर भेदभावाचा आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, “भूपेंद्र हुड्डा हरियाणाचे मुख्यमंत्री (minister) असताना त्यांनी गीता आणि बबिता फोगाट यांच्याशी भेदभाव केला होता. भूपेंद्र हुड्डा आज जे बोलत आहेत ती निव्वळ राजकीय स्टंटबाजी आहे.”
गीता आणि बबिता फोगाट यांच्यासोबत झालेल्या भेदभावाची कथा
महावीर फोगाट यांनी स्पष्ट केले की, “2005 आणि 2010 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये बबिता फोगाटने रौप्यपदक तर गीता फोगाटने सुवर्णपदक जिंकले होते. राष्ट्रकुल सुवर्णपदक जिंकणारी गीता पहिली भारतीय कुस्तीपटू होती. त्यानंतर 2012 मध्ये गीता ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली महिला कुस्तीपटू ठरली. त्या काळात हुड्डा यांचेच सरकार होते, आणि गीता-बबिता यांना डीएसपी बनवायचे होते, पण हुड्डा यांनी भेदभाव करून गीताला इन्स्पेक्टर आणि बबिताला सब इन्स्पेक्टर बनवले. या प्रकरणी आम्हाला कोर्टात जावे लागले, जिथे आम्हाला न्याय मिळाला.”
विनेशला राज्यसभा खासदार करण्याची मागणी
त्याचवेळी काँग्रेस खासदार दीपेंद्र हुड्डा यांनी म्हटले की, “विनेश हरली नाही, तर तिने देशवासीयांची मने जिंकली आहेत. खरेतर खेळ प्रणाली हरली आहे. सुवर्णपदक विजेत्याला ज्या सुविधा दिल्या जातात त्या सरकारने तिला उपलब्ध करून द्याव्यात. आज हरियाणामध्ये राज्यसभेची एक जागा रिक्त आहे. आमच्याकडे बहुमत नाही, पण खासदार होण्यासाठी देशात योग्य कोणी असेल तर ती विनेश आहे. कारण ती जगासाठी आणि देशासाठी प्रेरणा आणि धैर्याचे प्रतीक म्हणून उदयास आली आहे.”
हेही वाचा :
गुड न्यूज! गेल्या महिन्यात नोकऱ्यांच्या मागणीत १२ टक्के वाढ
Tata Curvv EV ने बाजारात घेतली कडक एन्ट्री, देणार 585Km रेंज
नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपालाच्या साखरपुड्याचा पहिला फोटो समोर