२९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीमध्ये होणाऱ्या बैठकीत मराठा समाजाच्या आगामी विधानसभा निवडणुकीबाबत (election)निर्णय घेण्यात येणार आहे. या बैठकीत विधानसभा पाडायची की उभी करायची याबद्दलचा निर्णय होईल. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आवाहन केले आहे की मराठा समाजाने आता राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या मागे न लागता मुला-बाळांच्या भविष्यासाठी आरक्षणाच्या लढ्यात सहभागी व्हावे.
जरांगे यांच्या शांतता फेरीचे आज सांगलीत आगमन झाले, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दुचाकी फेरीने विश्रामबाग येथे आगमन झाले. त्यानंतर पायी शांतता फेरी राम मंदिर चौकापर्यंत काढण्यात आली आणि एक जाहीर सभा घेण्यात आली.
जरांगे म्हणाले की, “माझा लढा हा मराठा समाजासाठी आहे. आम्हाला आरक्षण हवे आहे आणि ते आमच्या मुला-बाळांच्या भविष्यासाठी आहे. मी या लढ्यापासून मागे हटणार नाही.” त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला की, समाजाच्या लढ्यापासून त्यांना परावृत्त करण्यासाठी वेगवेगळ्या प्रयोगांचा वापर केला जात आहे.
हेही वाचा :
नीरज चोप्राने जिंकले रौप्यपदक, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पाचवे पदक
वजन गट बदलताना कुस्तीपटूंना येणाऱ्या आव्हानांची किनार विनेश फोगाटचा अनुभव
नगराध्यक्ष आरक्षणाच्या विळंबामुळे १०५ नगरपंचायती प्रशासकांच्या ताब्यात