विधानसभेच्या निवडणुकीच्या (election)पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी हालचालींना गती दिली आहे. महायुतीने देखील आपल्या प्रचाराची रणनीती ठरवली असून, याबाबतची माहिती मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत देण्यात आली.
8 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह इतर प्रमुख सदस्य उपस्थित होते. बैठकीत महायुतीच्या समन्वय मेळाव्यांचे आणि संवाद दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. 20 ऑगस्टपासून राज्यभरात प्रचार दौरे सुरू होणार आहेत, असे भाजप आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांचे जाहीर सभा:
सातही विभागांमध्ये मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक सभा आयोजित करण्यात येणार आहे. दौऱ्याच्या वेळेचे नियोजन करताना, कमीत कमी सात दिवसांचा आणि जास्तीत जास्त दहा दिवसांचा दौरा ठरवण्यात आलेला आहे. दररोज दोन किंवा तीन विधानसभा कव्हर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. प्रचाराच्या सुरुवातीस कोल्हापुरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाने अभियानाची सुरूवात होईल, असे लाड यांनी सांगितले.
जागावाटपावर चर्चा:
महायुतीत जागावाटप संदर्भात प्राथमिक चर्चा झाली आहे. तीन प्रमुख नेत्यांनी यावर चर्चा केली असून, दिल्लीच्या नेतृत्वाखाली योग्य निर्णय घेतले जातील. जागावाटपावर अंतिम निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, असे लाड यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरेंवर टीका:
प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांच्या सत्तेसाठी आणि मुख्यमंत्री पदासाठी लाचारी पत्करण्याच्या आरोपावर टीका केली. ठाकरे यांनी काँग्रेसच्या नेत्यांच्या दारी जाऊन बसण्याची परिस्थिती येवून महायुतीची तिरस्काराची टिप्पणी केली आहे.
महायुतीच्या या नवीन योजनेमुळे विधानसभेच्या निवडणुकीत राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. आगामी प्रचारातील प्रत्येक टप्पा महत्त्वाचा ठरणार आहे.
हेही वाचा :
नीरज चोप्राने जिंकले रौप्यपदक, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पाचवे पदक
वजन गट बदलताना कुस्तीपटूंना येणाऱ्या आव्हानांची किनार विनेश फोगाटचा अनुभव