बापरे! आईला फोनचे इतके व्यसन; चक्क स्वतःच्या बाळाला ठेवले फ्रीजमध्ये

प्रत्येक माणसाला कसले ना कसले व्यसन असतेच. जरी एखादा माणसाने कितीही नकार(fridge) दिला म्हणजे त्याला कसलेच व्यसन नसणे तर अशक्यच आहे. कारण व्यसन फक्त धूम्रपण आणि मद्यपान नसते. कधी माणूस एखाद्या वस्तूच्या, एखाद्या वास्तूच्या, एखाद्या सवयीच्या तर कधी कधी तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होतो.

तंत्रज्ञानाच्या व्यसनाचे प्रमाण इतके(fridge) वाढले आहे कि अगदी लहान मुलेही या गोष्टीच्या आहारी गेले आहेत. माणूस या तंत्रज्ञानामागे वेडा झाला आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. जर तुम्हाला ही मोबाईलच्या सोबतीची सवय लागली आहे, तर तुम्ही देखील तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन व्यवसानाधीन झाला आहात.

मोबाईल फोनचे व्यसन खूप वाईट असते. कारण आजपर्यंत अनेक जणांच्या मृत्यूंना हे मोबाईल फोन कारणीभूत ठरले आहे. पावसाळ्यात रस्त्यावर चालताना मोबाईल फोनमध्ये पाहत चालण्याची सवय अनेकांच्या जीवावर बेतली आहे. खड्यात पडून अनेकांचे मृत्यू झाले आहे. याला कारणीभूत खड्ड्यांपेक्षा जास्त संबंधित व्यक्तीचे मोबाईल फोनचे व्यसन आहे.

अनेकदा लोकं तर गाडी चालवतानाही रस्त्यापेक्षा जास्त लक्ष मोबाईल फोनकडे देतात. अनेक दुर्घटना घडवून बसतात. मोबाईल फोनचे व्यसन दाखवणारे अशीच एक व्हडिओ सध्या व्हायरल झाली आहे. या व्हिडिओमध्ये आई मोबाईल फोनच्या इतकी अधीन जाते कि स्वतःला एक लहान बाळ आहे तेही विसरून जाते.

व्हडिओमध्ये आई कॉलवर बोलत आहे. तसेच तिचा चिमुरडा खेळत आहे. आई कॉलवर बोलत असताना भाजी कापत आहे. यादरम्यान भाजी फ्रिजमध्ये ठेवण्यासाठी ती उठते आणि फोनच्या नादात स्वतःच्या बाळालाच फ्रिजमध्ये ठेवते. नंतर तिचा नवरा बेडरूममधून बाहेर येतो आणि बाळ कुठे आहे विचारतो तर ती नवऱ्याला चक्क दुर्लक्ष करते.

https://twitter.com/i/status/1773923035160195548

नंतर नवऱ्याने शोधाशोध करूनही बाळाचा ठावठिकाणा लागत नाही तेव्हा तो तिच्या हातातून फोन खेचतो आणि दम देतो. शेवटी बाळाच्या आवाजाने कळून येते कि बाळ फ्रिजमध्ये बंद आहे. या व्हिडीओखली नेटकर्त्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला असून त्या बाळाच्या आईच्या बेफिकीरपणामुळे चांगलेच सुनावले आहे.

हेही वाचा :

पूजा खेडकरच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल, पुण्यात सरकारी कामकाजात अडथळा आणल्याचा आरोप

महायुतीच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्लॅनची घोषणा: 20 ऑगस्टपासून सात विभागांत प्रचार दौरे

इचलकरंजीत यंत्रमागधारकांची एकजूट: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विज बिल सवलतीसाठी निवेदन