वारं फिरलं, वातावरण हेरलं! बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार? 

आत्ताच्या सरकारमध्ये रयतेचे दिवस चांगले नाहीत. दिव्यांगसाठी सरकारचे(atmosphere) धोरण नाही. युवकांसाठी धोरण आले पण बजेट नाही असे म्हणत प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार टीका केली. माझी महायुतीसोबत सोयरीक नाही.

जनतेसोबत त्यांचं पटलं नाही तर आमचं जमणार(atmosphere) नाही. आमच्या मागण्या मान्य करुन शासन निर्णय काढावा असे कडू म्हणाले. आज 4 वाजेपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर महायुतीसोबत राहण्याबाबतचा निर्णय घेणार असल्याचं कडू म्हणाले.

सरकारनं आमच्या मागण्या मान्य कराव्यात असे बच्चू कडू म्हणाले. मागण्या मान्य न झाल्यास पुढील निर्णय 4 वाजता जाहीर करणार असल्याचे कडू म्हणाले. मागण्या मान्य करण्यासाठी सरकाराला 4 वाजेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. महायुतीत सोडायचं की नाही याचा निर्णय 4 वाजता घेणार असल्याचे कडू म्हणाले.

बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
-स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी तातडीने मंजूर करुन त्याची अंमलबजावणी करण्यात यावी.

-पेरणी ते कापणी पर्यंतची सर्व कामे MREGS किंवा राज्याच्या रोजगार हमी योजने अंतर्गत करण्यात यावीत..

-कांद्याला हमीभाव देऊन नाफेडचा हस्तक्षेप बंद करावा. कांदा निर्यातबंदी संदर्भात स्वतंत्र धोरण असावे.

-शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन पुढील 2 वर्षासाठी कर्जाच्या मुद्दल व व्याजात 50 टक्के माफी देण्यात यावी

-दिव्यांगाना प्रतिमाह 6000 रुपये सामाजिक सुरक्षा वेतन, स्वतंत्र घरकुल योजना, स्वतंत्र स्टॉल धोरण, म्हाडामध्ये 5% आरक्षण, दिव्यांग वित्त महामंडळ, कर्जमाफी व विना मॉर्गेज कर्जवाटप तसेच अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात यावा.

-घरकुलासाठी 5 लक्ष निधी असावा. शहर आणि ग्रामीण भागात समान निधी देण्यात द्यावा.

-शहीद परिवार, माजी सैनिक, हुतात्मा स्मारक व गड किल्ल्यांसाठी स्वतंत्र धोरण जाहीर करावे.

हेही वाचा :

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीला खिंडार? 

विनेश फोगाटला सर्वात मोठा दिलासा; काही तासांतच समोर येणार निकाल

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अखेर जामीन मंजूर