मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या मराठवाडा दौरा करत आहेत(political). काल 9 ऑगस्टरोजी त्यांच्या ताफ्यावर बीड येथे काही लोकांनी सुपाऱ्या फेकल्या होत्या. त्यांनी महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, असं वक्तव्य मागे केलं होतं. त्यावरून बराच वाद झाला होता. तर, आज राज ठाकरे हे छत्रपती संभाजीनगर येथे आहेत. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी संपूर्ण प्रकरणावर भाष्य करत विरोधकांना इशारा दिला.
पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी माझ्या नादी लागू नका, माझी पोरं काय(political) करतील यांना कळणार पण नाही, असा निर्वाणीचा इशारा दिला. तसंच महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, असं ते पुन्हा एकदा म्हणाले आहेत.
“राज्यात सध्या जातीचे राजकारण केले जात आहे. आर्थिकदृष्ट्या जो मागासलेला आहे, त्याला आरक्षण द्यावं. त्याच्या ऐवजी आपल्याकडे फक्त जातीचं राजकारण केलं जातं. जातीच्या राजकारणातून माथी भडकवली जातात.”, असं राज ठाकरे म्हणाले.
“काल एक शिवसेनेचा जिल्हाप्रमुख त्याला आमच्या पोरांनी मार मार मारलं. नशिब पोलीस मध्ये पडले. तो ओरडत होता एक मराठा लाख मराठा, म्हणजे काय? त्यांना दाखवायचं की हे जरांगे पाटलांचे माणसं आहेत. यांच्याआडून यांचं विधानसभेचं राजकारण सुरूये. लोकांनी हे सगळं समजून घ्यावं.”, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय.
तसंच पुढे ते म्हणाले की, “मुंबईत मराठा समाजाचा जेव्हा 2004 किंवा 2005 मध्ये मोर्चा झाला तेव्हा मोर्चाच्या व्यासपीठावर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे लोकं होते. तुमचं एकमत आहे तर थांबवलं कुणी? 15-20 वर्ष झाले. तुम्ही आरक्षण का दिलं नाही?”, असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.
या दरम्यान राज ठाकरे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला. “उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना पुढच्या तीन साडेतीन महिन्यात दंगली घडवायच्या आहेत. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. शरद पवार यांचं राजकारण पाहिलं तर जेम्स लेनप्रकरणापासून सुरू केलं. ते स्टेप बाय स्टेप सुरू आहे. दुसऱ्यांच्या जातीबद्दल द्वेष करणं हे राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर शरद पवार यांनी सुरू केलं.”, असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.
हेही वाचा :
महाराष्ट्र होमगार्ड भरती लवकरच होणार सुरु…
खुशखबर! महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन
मुलींसाठी 500, कपलसाठी 800, मुलांसाठी 1000…त्या फ्लॅटमधून येत होते विचित्र आवाज