भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू शुभमन गिल हा त्याच्या खेळासोबतच पर्सनल(marriage) लाईफमुळेही कायम चर्चेत रहात असतो. नुकताच तो आयपीएल 2024 मध्ये गुजरात संघाची धुरा सांभाळताना दिसला. आपल्या दमदार खेळीने त्याने अनेकांची मनं जिंकली आहेत. अशात शुभमन त्याच्या लग्नामुळे चर्चेत आला आहे. शुभमन एका अभिनेत्रीच्या प्रेमात क्लिनबोल्ड झाल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शुभमनचे नाव हे अभिनेत्री रिद्धीमा पंडितसोबत (marriage)जोडले जात आहे. त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा देखील रंगल्या. इतकंच काय तर,दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचं देखील म्हटलं गेलं. या चर्चेवर आता अभिनेत्रीने मौन सोडलं आहे.
‘बहू हमारी रजनीकांत’ फेम अभिनेत्री रिद्धीमा पंडित ही याच वर्षी लग्न करणार असल्याच्या चर्चेला जोर आला आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, शुभमन आणि रिद्धीमा लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या लग्नाची तारीख देखील समोर आली आहे.
रिद्धीमा पंडित आणि शुभमन गिल डिसेंबर 2024 मध्ये लग्न करणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. दोघांना त्यांचं लग्न गुपित ठेवायचं असल्याची माहिती समोर आली आहे. तर, या सगळ्या चर्चेवर अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलंय.
“सकाळी जेव्हा मी उठले तेव्हा मला अनेकांनी फोन कॉल्स केले होते. प्रत्येक जण मला शुभमनसोबत लग्नाबद्दल विचारत होते. मी लग्न केव्हा आणि कोणासोबत करेल… वेळ आल्यानंतर मी याबद्दल सांगेल… पण सध्या तरी असं काहीही नाही.”, असं अभिनेत्री म्हणाली आहे.
त्यामुळे तूर्तास तरी या सगळ्या चर्चा या अफवा असल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान, यापूर्वी शुभमनचे नाव हे अभिनेत्री सारा अली खानसोबत जोडलं गेलं आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो देखील व्हायरल झाले आहेत. याचबरोबर सारा तेंडुलकरसोबतही शुभमनचे नाव जोडण्यात आले आहे.
सारा तेंडुलकरला शुभमनच्या बहिणीसोबत आणि त्याच्यासोबत खूपदा स्पॉट करण्यात आलं आहे. मात्र, दोघांनी कधीच नात्याची कबुली दिलेली नाहीये. तर, सारा अली खानने देखील कपिल शर्माच्या शो मध्ये असं काहीही नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा :
गौप्य स्फोटाचं गांभीर्य आता राहिलंच नाही!
“माझ्या नादी लागू नका, माझी पोरं काय करतील ते कळणारही..”; राज ठाकरेंचा इशारा
प्रताप होगाडे यांची महाराष्ट्र चेंबरच्या पॉवर टॅरिफ समितीच्या चेअरमनपदी नियुक्ती