उद्धव ठाकरेंना मोठा धक्का: दिघेंच्या विश्वासू सहकारी अनिता बिर्जे शिंदे गटात सामील

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ठाण्यामध्ये काल जाहीर सभा झाली. महाराष्ट्र(political) नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी घातलेला राडा अन् ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर तोफ डागल्याने ठाण्यातील ही सभा चांगलीच गाजली. मात्र ठाण्यात उद्धव ठाकरे यांची सभा सुरू असतानाच पक्षाला मोठे खिंडार पडले असून ठाणे जिल्ह्याच्या ठाकरे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख अनिता बिर्जे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या मोर्चेबांधणीसाठी उद्धव ठाकरे(political) मैदानात उतरले आहेत. काल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये जाहीर सभा घेतली. या उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मात्र ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांनी त्यांना मोठा धक्का दिला आहे.

काल शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या, ठाण्याच्या महिला जिल्हा प्रमुख आणि स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्याकाळापासून पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कट्टर शिवसैनिक अनिता बिर्जे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाणे जिल्हा महिला संघटिका सौ.मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेविका सुवर्णा करंजे तसेच ठाणे शिवसेनेतील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

अनिता बिर्जे या शिवसेना पक्षाच्या कट्टर, आक्रमक शिवसैनिक म्हणून ओळखल्या जात होत्या. धर्मवीर आनंद दिघे यांच्यापासून त्या पक्षासोबत कार्यरत होत्या. शिवसेनेच्या जडणघडणीच्या कालखंडात सौ.अनिता ताई बिर्जे यांनी तत्कालीन शिवसैनिकांच्या साथीने शिवसेनेची महिला आघाडी तळागाळात पोहचवली होती. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

हेही वाचा :

आजचे राशिभविष्य: रविवार, ११ ऑगस्ट २०२४ -तुमच्या राशीत आज काय लिहिलंय?

अभिनेते विजय कदम यांचे निधन: मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर केली बोचरी टीका, ‘सुपारी तोंडातून थुंक’ असा आक्षेप