मंत्र्यांच्या दौऱ्याला काळे झेंडे व निदर्शने निर्णय ८ दिवसासाठी स्थगित

इचलकरंजी : सुळकुड प्रश्नी कृती समितीने मंत्र्यांना गावबंदी जाहीर केल्यामुळे(flags) मा. जिल्हाधिकारी यांनी तातडीने दि. ९ ऑगस्ट रोजी शासन नियुक्त समितीचा अहवाल शासनास पाठविला व तशी माहिती देऊन आंदोलन थांबवावे असे जिल्हाधिकारी यांनी समितीस विनंतीपत्र दिले.

तथापि मुख्यमंत्री जोपर्यत निर्णायक बैठक लावत नाहीत तोपर्यत माघार नाही असा कृती समितीचा निर्णय(flags) समितीने सर्व संबंधितांना कळविला. दरम्यान मा. मुख्यमंत्री यांचा कोल्हापूर दौरा अचानक ठरला. या दौऱ्याचे वेळी मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांची समक्ष या विषयावर चर्चा झाली.

मुख्यमंत्री यांनी त्वरीत बैठक लावण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार मा. जिल्हाधिकारी यांनी फोनवरून माहिती दिली व त्यांच्या सूचनेनुसार मा. आयुक्त यांनी रात्री ११.२० वाजता कृती समितीस लेखी पत्र दिले आहे.

मा. मुख्यमंत्री यांचे समक्ष आश्वासन व मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेली माहिती यांचा आदर करून कृती समितीने सदरची निदर्शने व काळे झेंडे आंदोलन ८ दिवसासाठी स्थगित केले आहे अशी माहिती कृती समितीच्या वतीने समन्वयक प्रताप होगाडे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

सुळकूड प्रश्न व उपमुख्यमंत्री दौरा या संदर्भात मा. जिल्हाधिकारी यांनी दि. ९ ऑगस्ट रोजी अहवाल पाठविल्यानंतर व पत्र दिल्यानंतर काल दि. १० ऑगस्ट रोजी दोन बैठका झाल्या. पहिली बैठक मा.अप्पर पोलीस अधीक्षकसो,मा.प्रांताधिकारीसो व मा.आयुक्तसो यांच्यासह १ वाजता उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयात झाली.

या बैठकीत मा. मुख्यमंत्री यांची बैठकीची तारीख ठरली व तसे पत्र मिळाले तरच फेरविचार होईल असे कृती समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. श्री. साळवे यांनी यासंदर्भात वरीष्ठांशी व मुंबई मंत्रालय यांच्याशी संपर्क साधून नंतर सायंकाळी पुन्हा बैठक घेऊ असे शेवटी सांगितले.

त्यानंतर सायंकाळी ६ वाजता इचलकरंजी महानगरपालिका कार्यालयात मा. आयुक्त व पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीच्या वेळी मुख्यमंत्री कोल्हापूर येथे येणार असे निश्चित झालेले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी मुख्यमंत्री यांच्याशी समक्ष चर्चा करावी व बैठकीची तारीख निश्चित करावी अशी मागणी कृती समितीने केली. त्यानंतर रात्री झालेल्या मुख्यमंत्री जिल्हाधिकारी चर्चेच्या वेळी मुख्यमंत्री यांनी बैठक आयोजित करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दिलेले आहे. त्यामुळे सदरचे आंदोलन ८ दिवसासाठी स्थगित करण्यात आले आहे.

वरील सर्व चर्चा, बैठका व निर्णय यामध्ये कृती समितीच्या वतीने समन्वयक प्रताप होगाडे यांच्यासह मदन कारंडे, शशांक बावचकर, अभिजित पटवा, कॉ. सदा मलाबादे, सुहास जांभळे, राहुल खंजीरे,विकास चौगुले,कॉ. सुनील बारवाडे, वसंत कोरवी, कॉ. हणमंत लोहार, प्रताप पाटील, रिटा रॉड्रिग्युस, सुषमा साळुंखे, जाविद मोमीन इ. प्रमुख सहभागी व उपस्थित होते.

हेही वाचा :

आजचे राशी भविष्य (11-08-2024)

दहावी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची मोठी संधी…

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का: दिघेंच्या विश्वासू सहकारी अनिता बिर्जे शिंदे गटात सामील