‘सूरज चव्हाणच्या अनाथ मुलीशी लग्नाच्या निर्णयाने पुन्हा जिंकली प्रेक्षकांची मनं’

बिग बॉस मराठी (big boss marathi) सीजन 5 च्या घरात स्पर्धक सूरज चव्हाण आपल्या प्रामाणिकपणामुळे आणि खेळातील उत्कृष्ट कामगिरीमुळे प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवत आहे. महाराष्ट्रातून मिळणाऱ्या मोठ्या सपोर्टमुळे सूरजचा प्रवास सोशल मीडियावरही चांगलाच चर्चेत आहे. त्याचं संयमी वागणं, खेळासाठी केलेली मेहनत, आणि इतर स्पर्धकांशी असलेली त्याची आपुलकी यामुळे त्याला फक्त प्रेक्षकांचं नाही तर शोच्या होस्ट रितेश देशमुख आणि अभिनेता अक्षय कुमारचंही कौतुक मिळतंय.

सूरजने नुकत्याच घरात केलेल्या एका संवादाने पुन्हा एकदा महाराष्ट्राची मनं जिंकली आहेत (big boss marathi). निक्की आणि जान्हवीसमोर सूरजने त्याच्या भावनांना वाट मोकळी करत, “मी अनाथ मुलीशीच लग्न करणार,” असं म्हटलं. आपल्या लहानपणीच्या आठवणी आणि आई-वडिलांच्या अचानक गेलेल्या दु:खद घटनेमुळे सूरजच्या मनात खोलवर असलेले विचार बाहेर आले. जान्हवीही या संवादामुळे भावूक झाली.

सूरजच्या या विचारांवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली असून, अनेक युजर्सनी त्याच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे. “भावा, तुझं नशीब तुला योग्य साथीदार नक्कीच मिळवून देईल,” असं एका युजरने म्हटलं आहे. या व्हिडीओमुळे सूरज चव्हाणने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत (big boss marathi).

हेही वाचा :

‘स्क्रीनवर आपले कपडे काढून…’; Aishwarya Rai चा सर्वात मोठा खुलासा

टीम इंडियाचा स्टार शर्माने उरकला साखरपुडा! होणारी बायको आहे तरी कोण?

अजय देवगणचा Raid 2 कधी प्रदर्शित होणार? दिग्दर्शकाने दिली मोठी अपडेट