कांबळवाडी, ता. राधानगरीचे सुपुत्र आणि पॅरिस ऑलिम्पिक (olympics) मध्ये ब्रॉन्झ पदक मिळवणारे आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू स्वप्निल कुसाळे यांच्या कोल्हापुरातील आगमनानिमित्त 21 ऑगस्ट रोजी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीचे नेतृत्व भोगावती साखर कारखान्याकडून करण्यात येत आहे, जे स्वप्निलच्या यशस्वी कामगिरीचा सन्मान करण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
स्वप्निल (olympics) यांचे कोल्हापूरातील कावळा नाका येथे सकाळी 10 वाजता जल्लोषात स्वागत करण्यात येईल. त्यानंतर मिरवणुकीस ताराराणी चौकातून प्रारंभ होईल आणि कांबळवाडीपर्यंत या उत्सवाची धूम राहणार आहे.
स्वप्निल सध्या पुण्यात असून, 13 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी दिल्लीला जाणार आहे. त्यांच्या मातोश्री अनिता कुसाळे, ज्या कांबळवाडीच्या लोकनियुक्त सरपंच आहेत, त्या देखील राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या दिल्लीतील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. कुसाळे कुटुंबीय 21 ऑगस्ट रोजी गावी परतणार आहेत.
स्वप्निलच्या या मिरवणुकीत भोगावती साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या नियोजनानुसार हत्तींचे आगमन होणार आहे. हे आयोजन दिवंगत माजी आमदार पी एन पाटील यांच्या इच्छेप्रमाणे केले जात आहे. कोल्हापूरकरांसाठी हा आनंदाचा क्षण असणार आहे, ज्यात संपूर्ण जिल्हा एकत्र येऊन आपल्या ऑलिंपिक (olympics) हिरोचा गौरव करणार आहे.
हेही वाचा :
इचलकरंजीत अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी भवनचे उद्घाटन..
‘सूरज चव्हाणच्या अनाथ मुलीशी लग्नाच्या निर्णयाने पुन्हा जिंकली प्रेक्षकांची मनं’
‘स्क्रीनवर आपले कपडे काढून…’; Aishwarya Rai चा सर्वात मोठा खुलासा