राज्यातील पेट्रोलच्या किमती या डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर(drivers) आधारित असतात. त्यामुळे नियमितपणे त्यात सुधारणा केली जाते. दररोज सकाळी पेट्रोलचे दर सुधारले जातात. अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी असे अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात.
जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या(drivers) किमती वाढतात. आज 12 ऑगस्ट रोजीचे इंधनदर सुधारले आहेत. आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किमती खाली सविस्तर दिल्या आहेत.
महाराष्ट्रात आज पेट्रोलची सरासरी किंमत 104.91 रुपये प्रतिलिटर आहे. गेल्या महिन्याच्या शेवटच्या तारखेला महाराष्ट्रात पेट्रोलची सरासरी किंमत 104.93 रुपये प्रति लिटर होती, त्या तुलनेत आता किंमत 0.02 टक्क्यांनी कमी झाली आहे.
गेल्या 10 दिवसांत महाराष्ट्रात पेट्रोलची सरासरी किंमत 104.91 रुपये प्रति लिटर आहे. तर, डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर या दराने विकले जात आहे. काल 11 ऑगस्टरोजी हेच दर 91.29 रुपये प्रति लिटर होते. तर, गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात डिझेलची सरासरी किंमत 91.44 रुपये प्रतिलिटर होती, त्या तुलनेत आता किंमत 0.01 टक्क्यांनी कमी झाली आहे.
राज्यात 1 ऑगस्ट रोजी पेट्रोलची किंमत 104.87 रुपये प्रति लिटरपासून सुरू झाली.आज 12 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील पेट्रोलची किंमत 0.02 टक्क्यांनी कमी होऊन 104.91 रुपये प्रति लिटर झाली आहे. पाहायला गेलं तर वाहनचालकांना इंधन दरात जराही दिलासा मिळाला नाहीये.
मेट्रो सिटीमधील इंधनदर
दिल्ली पेट्रोल (प्रति लिटर ) 94.72 तर डिझेल 87.62
मुंबई पेट्रोल (प्रति लिटर ) 103.44 तर डिझेल 89.97
कोलकाता पेट्रोल (प्रति लिटर ) 104.95 तर डिझेल 91.76
चेन्नई पेट्रोल (प्रति लिटर ) 100.75 तर डिझेल 92.34
बेंगलुरु पेट्रोल (प्रति लिटर ) 99.84 तर डिझेल 85.93
हेही वाचा :
आता राजकीय पडद्यावर चित्रपटांचा सिलसिला…?
अशोक चक्राचा रंग निळाच का असतो? त्यावर 24 आऱ्याच का असतात?
देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात रंगलं पोस्टर वॉर; बॅनरच्या माध्यमातून भाजप-काँग्रेसमध्ये खडाजंगी