“राहुल गांधी अत्यंत खतरनाक, विध्वंसक असून ते कधीच पंतप्रधान..”; कंगना रनौतचा संताप

अमेरिकेतील शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चचा एक नवा रिपोर्ट समोर (anger)आला आहे. यावेळी त्यांनी सेबी अध्यक्षांवरच आरोप केला आहे. अदानींच्या शेअर्स कंपन्यांमध्ये त्यांचा हिस्सा होता, असा आरोप या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या रिपोर्टवरूनच कॉँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी देखील सवाल केले आहेत.

हिंडेनबर्गच्या या रिपोर्टवरून राहुल गांधी यांनी सरकारला(anger) घेरलं आहे. राहुल गांधींच्या टिकेनंतर आता त्यांच्यावर भाजपाकडूनही जोरदार हल्ला करण्यात आला आहे. भाजपच्या नवनिर्वाचित खासदार कंगना रनौत यांनी त्यांच्या एक्सवर (पूर्वीचे ट्वीटर) याबाबत एक पोस्ट लिहीत राहुल गांधी यांना खडेबोल सुनावले आहेत.

“राहुल गांधी हे सर्वात धोकादायक व्यक्ती आते. ते अत्यंत कडू, विषारी आणि विध्वंसक आहेत. त्यांचा अजेंडा असा आहे की, जर ते पंतप्रधान झाले नाहीत तर ते या देशालाही नष्ट करू शकतात. हिंडेनबर्ग अहवालाने आपल्या शेअर बाजाराला लक्ष्य केले आहे, ज्याला राहुल गांधींनी पाठिंबा दिला होता आणि तो अहवाल निरुपयोगी ठरला आहे.”, अशी पोस्ट कंगनाने केली आहे.

पुढे तिने लिहिले की, “ते या देशाची सुरक्षा आणि अर्थव्यवस्था अस्थिर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. श्रीमान राहुल गांधी आयुष्यभर विरोधी पक्षात बसायला तयार राहा. ज्या प्रकारे तुम्ही आता दुःखी आहात, त्याच प्रकारे या देशातील जनतेचा राष्ट्रवाद, अभिमान आणि गौरव पाहून तुम्हाला आणखी दुःख होत राहील. इथले लोक तुम्हाला कधीही नेता बनवणार नाहीत. तुम्ही एक कलंक आहात.”

राहुल गांधी यांनी हिंडेनबर्गच्या रिपोर्टवरून संसदेत काही सवाल केले होते. याचबरोबर त्यांनी ट्वीटवर देखील एक पोस्ट केली होती. “लहान किरकोळ गुंतवणूकदारांच्या संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी सोपवलेली सिक्युरिटीज रेग्युलेटर SEBI ची अखंडता त्याच्या अध्यक्षांवरील आरोपांमुळे गंभीरपणे धोक्यात आली आहे. “, असं राहुल गांधी म्हणाले होते.

याचबरोबर त्यांनी सरकारला काही सवाल देखील केले. SEBI चेअरपर्सन माधवी पुरी बुच यांनी अद्याप राजीनामा का दिला नाही?, जर गुंतवणूकदारांनी कष्टाने कमावलेला पैसा गमावला तर कोणाला जबाबदार धरले जाईल, पंतप्रधान मोदी, सेबी चेअरपर्सन की गौतम अदानी? समोर आलेल्या या नवीन आणि अत्यंत गंभीर प्रकरणात सर्वोच्च न्यायालय पुन्हा एकदा स्वत:लक्ष देईल का?, असे रोखठोक प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत.

हेही वाचा :

लग्नाच्या 6 महिन्यात रकुल प्रीत आणि जॅकी भगनानीमध्ये ‘तिसरं’ कोण

सोनं-चांदीच्या किंमतीत घसरण कायम, जाणून घ्या आजचे दर

वाहनचालकांना झटका! ‘या’ शहरांत पेट्रोल महागलं…