श्रावण सोमवारी मोठी दुर्घटना! सिद्धेश्वर मंदिरात चेंगराचेंगरीत 7 भाविकांचा मृत्यू

श्रावणातील चौथ्या सोमवारी बिहारच्या जहानाबादमध्ये शंकराला जलाभिषेक(news) करण्यासाठी भाविकांची गर्दी जमली होती. या मंदिरात सकाळी (12 ऑगस्ट) अचानाक धक्का–बुक्की झाल्याने रांग मोडली आणि चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंरीत 7 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे. तर यामध्ये 12 हून अधिक जण जखमी देखील झाले आहेत. यापैकी अनेक जखमी भाविकांची तब्येत गंभीर असल्याचे समजते. जहानाबादजवळील बाबा सिद्धेश्वर नाथ मंदिर परिसरात ही घटना घडली.

श्रावण महिन्यात भाविक दर्शनासाठी जहानाबादजवळील बाबा सिद्धेश्वर नाथ मंदिरात येत असतात. जातात. मुख्यत: रविवारी रात्रीपासून मंदिरांमध्ये लांबच्या लांब रांगा लागायला सुरुवात होते. आजूबाजूच्या गावातील व तालुक्यांतील भाविक येथे दर्शनासाठी येतात. आज (१२ ऑगस्ट) श्रावणी सोमवार असल्याने मध्यरात्रीपासून भाविकांनी या मंदिरात गर्दी केली होती.

अशातच आज सकाळी (12 ऑगस्ट) अचानाक धक्का–बुक्की(news) झाल्याने रांग मोडली आणि चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे एकच खळबळ माजली, भक्तांची धावपळ सुरू झाली आणि भाविकांनी जीव गमावला. मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत गाडल्या गेलेल्या सात भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर 12 हून अधिक शिवभक्त जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. जहानाबादजवळील बाबा सिद्धेश्वर नाथ मंदिर परिसरात ही घटना घडली. प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. सुरक्षा दल आणि जत्रेच्या परिसरात तैनात स्वयंसेवकांच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी (11 ऑगस्ट) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली. बाराबार हिल चढत असताना पायऱ्यांवर चेंगराचेंगरी झाल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. जीव वाचवण्याच्या प्रयत्नात भाविक पळू लागले. यादरम्यान सुमारे 24 लोक जखमी झाले. यातील 16 जखमींना जेहानाबाद सदर हॉस्पिटल आणि मखदुमपूर रेफरल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. त्यापैकी सहा जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचे पथक तत्परतेने काम करत आहे. पोलीस आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी मंदिर परिसरात पोहोचले आहेत. तेथे मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे.

यापूर्वी वैशाली जिल्ह्यातील सुलतानपूर येथे ५ ऑगस्ट रोजी कंवर यात्रेदरम्यान असाच मोठा अपघात झाला होता. भोलेनाथांच्या जलाभिषेकासाठी निघालेल्या कंवर यात्रेचा भाग असलेल्या डीजे ट्रॉलीला 11 हजार व्होल्टचा करंट वाहून नेणाऱ्या वायरला धडकली. या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. भोले बाबाच्या भजनावर नाचत असताना हे कंवरीया डीजे ट्रॉलीवर स्वार झाले होते. दरम्यान, हाजीपूर औद्योगिक परिसरातील सुलतानपूर येथे त्याच्यासोबत धावणाऱ्या डीजे ट्रॉलीचा एक भाग हाय टेंशन वायरच्या संपर्कात आला. ट्रॉलीवर बसलेल्या सर्व जणांना विजेचा धक्का बसला.

हायव्होल्टेजमुळे ट्रॉलीला आग लागली आणि डझनहून अधिक शिवभक्त जळून खाक झाले. त्यापैकी 9 जणांचा मृत्यू झाला. यानंतर एकच जल्लोष झाला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला असून मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची तत्काळ भरपाई देण्यात आली आहे.

हेही वाचा :

सोनं-चांदीच्या किंमतीत घसरण कायम, जाणून घ्या आजचे दर

लग्नाच्या 6 महिन्यात रकुल प्रीत आणि जॅकी भगनानीमध्ये ‘तिसरं’ कोण

“राहुल गांधी अत्यंत खतरनाक, विध्वंसक असून ते कधीच पंतप्रधान..”; कंगना रनौतचा संताप