अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने आजवर वेगवेगळ्या भूमिकांमधून आपल्या(express entry) अभिनयाचे सशक्त पैलू उलगडून दाखविले आहेत, प्रत्येक भूमिकेत स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारी ही अभिनेत्री आता ‘अहो विक्रमार्का’ या दाक्षिणात्य अॅक्शनपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असून या चित्रपटात वीरांगणा ‘भवानी’ ही महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारत आहे.
दिग्दर्शक राजामौली यांच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शक(express entry) म्हणून काम केलेल्या त्रिकोटी पेटा यांच्या आगामी ‘अहो विक्रमार्का’ या चित्रपटात अनेक मराठी कलाकार झळकणार आहेत. देव गिल प्रॉडक्शन अंतर्गत ‘अहो विक्रमार्का’ मराठी व्यतिरिक्त इतर 5 भाषांमध्ये रुपेरी पडद्यावर 30 ऑगस्टला रिलीज होणार आहे.
आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना तेजस्विनी सांगितले आहे की, ‘कोणत्याही नवीन प्रोजेक्ट मध्ये काम करताना कलाकारांसाठी त्यातील आव्हान ही सुखावह असतात. त्यातही आपली मातृभाषा नसलेल्या इतर चित्रपटांमध्ये काम करताना हे आव्हान अधिक कठीण असते. ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटात सगळ्यात मोठं भाषेचे आव्हान होते कारण केवळ भाषा नव्हे तर त्याचं व्याकरण सुद्धा समजून घ्यावं लागतं.
मला माझ्या संवादात प्रत्येक शब्दामागील अर्थ आणि लहेजा समजून-उमजून भूमिका करावी लागत होती. साऊथचे सगळे कलाकार आणि तंत्रज्ञ वेळेबाबतीत प्रचंड शिस्तप्रिय आहेत. त्यांचा साधेपणा मला खूप भावला. आजवर माझ्या वेगवेगळ्या भूमिकांना प्रेक्षकांनी मला चांगला प्रतिसाद दिला असून ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटातील माझ्या भूमिकेचं प्रेक्षक नक्कीच स्वागत करतील याची मला खात्री आहे.
हा दाक्षिणात्य सिनेमा असला तरी तो मराठीत देखील प्रदर्शित होणार आहे. आता दाक्षिणात्य आणि मराठी कलाकार चित्रपटात काय कमाल करतात? हे पहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटसृष्टीतील पहिला ब्लॉकबस्टर-पॅन इंडिया चित्रपट 6 भाषांमध्ये 30 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. अभूतपूर्व साहस, जाज्वल्य देशाभिमान दाखवत पोलिसांच्या शौर्याला, खाकी वर्दीतल्या हिरोंना सलाम करणारा ‘अहो विक्रमार्का’ हा चित्रपट आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता देव गिल या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत आहेत. धडाकेबाज अॅक्शनसीन, नायक नायिका यांच्यातील फुलणारं प्रेम आणि कुटुंबामधील प्रभावी नाट्य अशा त्रिसूत्रीवर आधारलेला रोमँटिक आणि अॅक्शनचे परफेक्ट कॉम्बिनेशन असलेला ‘अहो विक्रमार्का’ हा मल्टीस्टारर चित्रपट प्रेक्षकांचं जबरदस्त मनोरंजन करेल.
आरती देविंदर गिल, मिहिर कुलकर्णी आणि अश्विनी कुमार मिश्रा निर्मित या चित्रपटाची कथा पेनमेत्सा प्रसाद वर्मा यांची आहे, तर संगीत रवी बसरूर आणि आर्को प्रावो मुखर्जी यांनी दिले आहे, छायांकन करम चावला आणि गुरु प्रसाद एन यांनी केले आहे आणि संकलन fतम्मीराजू यांनी केले आहे. ‘अहो विक्रमार्का’ हा पहिला मराठी चित्रपट आहे, जो एकाच वेळी मराठी आणि तेलगु या दोन भाषेत चित्रित करण्यात आला आहे.
हेही वाचा :
मनसेचा राडा… मनसैनिकांनी आता टोलनाका फोडला
श्रावण सोमवारी मोठी दुर्घटना! सिद्धेश्वर मंदिरात चेंगराचेंगरीत 7 भाविकांचा मृत्यू
“राहुल गांधी अत्यंत खतरनाक, विध्वंसक असून ते कधीच पंतप्रधान..”; कंगना रनौतचा संताप