पेट्रोलनंतर डिझेलमध्येही होणार इथेनॉलचा वापर; ऊस, मका उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा!

केंद्र सरकारकडून इथेनॉल उद्योगाला प्रोत्साहन(Sugarcane) दिले जात आहे. सध्याच्या घडीला देशात पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. जे सरकारकडून लवकरच साध्य केले जाण्याची शक्यता आहे. अशातच आता सरकारकडून डिझेलमध्ये ५ टक्के इथेनॉल मिश्रणाचा विचार केला जात आहे.

एका नामांकित वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, सरकार पेट्रोलमध्ये (Sugarcane)इथेनॉल मिश्रणाचे २० टक्क्यांचे लक्ष्य साध्य करण्याच्या अगदी जवळ पोहचले आहे. येत्या दोन वर्षात हे लक्ष्य गाठले जाऊ शकते. त्यामुळे सरकारकडून आता डिझेलमध्ये ५ टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचा विचार सुरु आहे.

केंद्र सरकारला डिझेलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. गेल्या आठवड्यात पंतप्रधान कार्यालयाला (पीएमओ) हा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. यावेळी सर्व संबंधित मंत्रालयाचे मंत्री आणि अधिकारी पंतप्रधान कार्यालयात उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता या प्रस्तावावर सरकारकडून विचार सुरु असून, या प्रस्तावाचे मूल्यांकन झाल्यानंतर त्यावर केंद्र सरकारकडून निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता असल्याचे केंद्र सरकारमधील अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

विशेष म्हणजे डिझेलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचा हा प्रस्ताव सरकारला अशावेळी प्राप्त झाला आहे. अलीकडेच पेट्रोलमध्ये १५ टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य केंद्र सरकारने साध्य केले आहे. जे २० टक्के इतके निश्चित करण्यात आले आहे. अशातच आता केंद्र सरकारने डिझेलमध्ये ५ टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचा सकारात्मक निर्णय घेतल्यास, इथेनॉलच्या मागणीमध्ये मोठी वाढ होणार आहे. दरम्यान, पर्यावरण संरक्षण आणि खनिजतेलाच्या आयातीवरील अवलंबवित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून इथेनॉल मिश्रणाला प्रोत्साहन दिले जात आहे.

इथेनॉलची निर्मिती प्रामुख्याने ऊस आणि मका या दोन पिकांपासून होते. याशिवाय काही प्रमाणात अन्य खराब झालेली धान्य देखील इथेनॉल निर्मितीसाठी वापरली जातात. मागील वर्षी एल-निनोच्या प्रभावामुळे ऊस उत्पादन काहीसे कमी राहण्याची शक्यता पाहता, केंद्र सरकारकडून उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास बंदी घालण्यात आली होती.

ज्यामुळे इथेनॉल निर्मिती उद्योगाने आपला मोर्चा मका खरेदीकडे वळवला होता. परिणामी, इथेनॉल निर्मितीमध्ये या दोन पिकांना खूप महत्व आहे. अशातच आता डिझेलमध्ये ५ टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचा सकारात्मक निर्णय झाल्यास, त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

हेही वाचा :

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला झटका; बडा नेता भाजपच्या गळाला

जबरदस्त! मराठमोळ्या अभिनेत्रीची साऊथमध्ये एन्ट्री

तर मी तुम्हालाच जबाबदार धरून तुमच्या अंगावर येणार! संभाजीराजेंचा थेट हसन मुश्रीफांना हातवारे करत इशारा