आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या आमदाराच्या एका वक्तव्यामुळे राजकीय (Political) वातावरण चांगलेच तापले आहे. “‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या काही विरोधकांची नावं निवडणुकीनंतर डिलिट केली जातील,” असे विधान आमदाराने केले आहे. या वक्तव्यानंतर विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत, शिंदे गटावर तीव्र टीका केली आहे.
विरोधकांच्या मते, ‘लाडकी बहीण’ योजनेचा वापर मतदारांना घाबरवण्यासाठी आणि राजकीय फायद्यासाठी केला जात आहे. विरोधकांनी हा मुद्दा विधानसभेत उचलण्याचा इशारा दिला असून, “सरकारने योजना राबवताना कोणत्याही प्रकारचा पक्षपातीपणा केला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील,” असे स्पष्ट केले आहे.
शिंदे गटाच्या आमदाराच्या विधानानंतर जनतेतही याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. ‘लाडकी बहीण’ योजना ही सर्वसामान्य महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे, आणि राजकीय हेतूने तिचा गैरवापर होणार असल्याच्या भीतीने लाभार्थ्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे.
या वादामुळे ‘लाडकी बहीण’ योजना पुढे कशी राबवली जाईल आणि राजकीय डावपेच कोणत्या दिशेने जातील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
मुलींच्या मोफत शिक्षणासाठी राज्य सरकारचा पुढाकार, हेल्पलाईन सुरू
मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा समारोप: नाशिकमध्ये उद्या शाळांना सुट्टी जाहीर
मुसळधार पावसात शेतकऱ्यांना ‘PM मोदी छत्री योजना’चा आधार: केंद्र सरकारची नवी योजना जाहीर