‘मी जेव्हा जेव्हा संसदेत बोलते तेव्हा पतीला आयकरची नोटीस’; सुप्रिया सुळे टार्गेट

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठा खळबळजनक(parliament) दावा केला आहे. त्यांनी मोदी सरकारवर अप्रत्यक्षपणे मोठे आरोप केले आहेत. मी संसदेमध्ये सरकारच्या विरोधात किंवा धोरणांवर जेव्हा बोलते तेव्हा माझे पती सदानंद सुळे यांना आयकर विभागाची नोटीस येते असं थेट सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

या अगोदरही अशा बातम्या येत होत्या की, संसदेत आक्रमकपणे(parliament) सरकारला प्रश्न विचारत असल्याने त्यांचे पती सदानंद सुळे यांना टार्गेट केले जाते. आता स्वत: सुप्रिया सुळे यांनी यावर भाष्य केले असल्याने त्याची राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

संसदेत माझ्या भाषणानंतर माझे पती सदानंद सुळे यांना आयकर नोटीस मिळाली. ही काही पहिलीच वेळ नाही, प्रत्येक वेळी मी संसदेत प्रश्न मांडते, तेव्हा अशाच नोटिसा येतात आणि त्यामधील प्रश्न सारखेच असतात असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्या मुंबईत बोलत होत्या.

हेही वाचा :

अगरवाल दाम्पत्याच्या जामीन अर्जास विरोध; पोलिसांनी कोर्टाला सादर केली गंभीर माहिती

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीचे तपशील: दिवाळीनंतर मतदान, नोव्हेंबरमध्ये निकाल