राजपाल यादववर कर्जाचा डोंगर; बँकेकडून कोट्यवधींच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई

बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव पुन्हा एकदा अडचणीत अडकला आहे. खरंतर बॅंकेनं(bank) त्याची मालमत्ता जप्त केली आहे. हे काही नवीन प्रकरण नाही, तर ही 2012 ची गोष्ट आहे. हा संपूर्ण प्रकार त्याच्या ‘अता पता लापता’ या चित्रपटाशी संबंधीत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील स्वत: राजपाल यादव यांनी केले होते आणि त्याची पत्नी राधा यादव ही निर्माती होती.

हा चित्रपट बनवण्यासाठी राजपाल यादवनं सगळं काही केलं. त्यांनं हा चित्रपट करण्यासाठी सेंट्रल बॅंक(bank) ऑफ इंडियाच्या वांद्रा ब्रांचमधून 5 कोटींचं लोन घेतलं होतं. असं म्हटलं जात की या कर्जासाठी राजपाल यादवनं त्याच्या वडिलांच्या नावावर असलेली जमीन आणि घर गॅरेन्टी म्हणून दिलं होत, असं म्हटलं जातं.

आता अशी बातमी आहे की कर्जाची परतफेड करू न शकल्यानं शाहजहांपुरमध्ये असलेली ही कोट्यावधींची संपत्ती आता सेठ एनक्लेवला बॅंकनं जप्त केलं आहे. असं म्हटलं जातं की राजपाल यादवनं तीन कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. ते हळू-हळू वाढून 11 कोटी.

मीडिया रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं जात होतं की मुंबईच्या सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचे अधिकारी दोन दिवसांपूर्वी शाहजहांपुरला पोहोचले होते. टीमनं अत्यंत गुप्तपणे रविवारी राजपालच्या मालमत्तेवर बँक बॅनर लावला, ज्यावर लिहिले आहे की ही मालमत्ता ही सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुंबईची आहे. त्यामुळे यावर कोणत्याही प्रकारचे खरेदी-विक्री करू नये.

राजपाल यादवनं कचारी ओव्हरब्रिजजवळची ही मालमत्ता एका मार्बल विक्रेत्याला भाड्याने दिली आहे. बँकेच्या टीमनं या प्रॉपर्टीच्या गेटला कुलूप लावून ती सील केली आहे. हे काम इतक्या वेगानं करण्यात आलं की आत सुरू असलेला कुलरही बंद झाला नाही, असं सांगण्यात येतं.

या आधी 2018 मध्ये राजपालला 3 महिन्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली होती. दिल्लीच्या एका कंपनी मुरली प्रोजेक्ट्सनं राजपाल यादवच्या ‘श्री नौरंग गोदावरी एन्टरटेनमेंट’ या कंपनी विरोधात एक सिव्हिल केस दाखल केली होती. राजपालनं हे कर्ज 2010 मध्ये घेतलं होतं.

हेही वाचा :

सर्वसामान्यांच्या शिक्षण हक्कासाठी प्राथमिक शिक्षकाचां जागे व्हा चा नारा

अगरवाल दाम्पत्याच्या जामीन अर्जास विरोध; पोलिसांनी कोर्टाला सादर केली गंभीर माहिती

‘मी जेव्हा जेव्हा संसदेत बोलते तेव्हा पतीला आयकरची नोटीस’; सुप्रिया सुळे टार्गेट