पुणे: लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रात भाजपला अपेक्षित(Assembly) यश मिळवता आले नाही.त्यानंतरही भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही या पराभवामुळे भाजपवर अनेकदा उघड नाराजी व्यक्त केली. आरएसएस आणि भाजपचे नेतेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. त्यामुळे भाजप आणि आरएसएसमधील मतभेदही चव्हाट्यावर आले होते. पण आता सर्व मतभेद विसरून भाजप आणि आरएसएसने विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीय केल्याचे दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान आरएसएस केडरचा(Assembly) मोठा वर्ग निवडणूक प्रचारापासून दूर राहिला होता. पण विधानसभा निवडणुकीसाठी आरएसएस भाजपसाठी मैदानात उतरली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणाच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आरएसएस-भाजप समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. महाराष्ट्रात आरएसएसचे सह सरचिटणीस अतुल लिमये यांना प्रचारासाठी भाजप आणि आरएसएसमध्ये समन्वय साधण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना महाराष्ट्र भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. “लोकसभा निवडणुकीत भाजपने अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे भाजप आणि आरएसएसमध्ये मोठे मतभेद झाले होते. त्यामुळे प्रचारपासून दूर राहून आरएसएस कॅडर महायुतीच्या उमेदवारांसाठी अप्रत्यक्षपणे पाठिंबा गोळा करत होते. अजित पवार महायुतीत सामील झाल्याचा त्यांच्या मनात राग होता. यासोबतच दोघांमध्ये इतरही अनेक अंतर्गत वाद निर्माण झाले होते. मात्र, यानंतर दोघांमध्ये समन्वय प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
पण लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर भाजप आणि आरएसएसमधील दरी कमी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आरएसएसचे ज्येष्ठ सदस्य सुरेश सोनी हे भाजप आणि आरएसएस या दोन्ही पक्षांमधील सर्वोच्च नेतृत्वांमध्ये मध्यस्थी करत आहेत. विशेष म्हणजे, सरकारने नुकताच एक आदेश जारी करून सरकारी अधिकाऱ्यांवर आरएसएसचे सदस्य होण्यावरील बंदीही हटवली आहे. दोघांमधील अंतर कमी करण्याचे पाऊल म्हणूनही याकडे पाहिले जात आहे.
दरम्यान, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटरवर उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोपही केले होते. “उद्धव ठाकरेंनी भगवा सोडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांपासून स्वतःला दूर केले. त्याऐवजी ते औरंगजेबाच्या वारसांची पालखी वाहत आहेत. ही तुमच्या पतनाची सुरुवात आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी तुम्ही आदरणीय बाळासाहेबांना विसरलात, महाराष्ट्रातील जनता तुम्हाला माफ करणार नाही.
21 जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (Assembly)सर्वेसर्वा शरद पवार यांना भ्रष्टाचाराचे गॉडफादर आणि उद्धव ठाकरे यांना ‘औरंगजेब फॅन क्लब’चे नेते म्हणत महाविकास आघाडीवर टीका केली होती. तेव्हापासून अमित शाह आणि महाविकास आघाडीत या शब्दयुद्धाची ठिणगी पडली. अमित शाहांचा टीकेला उद्धव ठाकरेंनी अमित शाह हे तर ‘आधुनिक अफगाणिस्तानचे संस्थापक अहमद शाह अब्दालीचे उत्तराधिकारी’ असे संबोधत पलटवारही केला होता.
तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाव न घेता अमित शाहांवर निशाणा साधला होता. “मराठा समजाला एकमेकांशी लढवताना अब्दालीला आनंद होतो. दिल्लीत बसलेल्या अहमदशाह आब्दालीकडून या लोकांनी महाराष्ट्रात अराजकता परसरवण्यासाठी सुपारी घेतली आहे. पण आपला केवळ एक प्यादे म्हणून वापर केला जात आहे, हे पक्ष कार्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे.हे आपल्या राज्यासाठी आरोग्यदायी नाही. मला कोणत्याही पक्षाचे नाव घ्यायचे नाही, पण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जवळ आल्याने ते लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे नक्की.” अशी टीका संजय राऊत यांनी केली होती.
हेही वाचा :
नवरा आणि प्रियकरानं रचला कट, ‘दृश्यम’ स्टाईल काढला काटा
नगराध्यक्षाचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्ष. . . मंत्रिमंडळात महत्त्वपूर्ण निर्णय
युट्युबरने बनवली Peacock Curry! व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ठोकल्या बेड्या