धावत्या ट्रकच्या चाकांवर मारल्या उड्या, तरुणांचा जीवघेणा स्टंट व्हायरल

काही लोकांना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. चित्र-विचित्र स्टंट(truck) मारून लोकांना चकित करणं त्यांना खूप आवडतं. शिवाय या स्टंटबाजीचे व्हिडीओ व्हायरल झाले तर खूप प्रसिद्धी मिळतेच पण सोबतच त्या प्रसिद्धीचा वापर करून चांगले पैसे देखील मिळवता येतात. त्यामुळे प्रसिद्धीच्या हव्व्यासापोटी हल्ली अनेक मुलं आपला जीव धोक्यात घालताना दिसताहेत.

अशाच दोन तरुणांचा एक व्हिडीओ(truck) समोर आला आहे. हे तरुण धावत्या ट्रकच्या खाली लटकून स्टंटबाजी करून दाखवत आहेत. मात्र हा जीवघेणा स्टंट पाहून नेटकरी चांगलेच भडकले. अन् या तरुणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

हा व्हिडीओ @Nishantjournali या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ बांगलादेशमधील असल्याचं म्हटलं जातेय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन तरुण स्केटींग शूज घालून फिल्मी स्टाईल स्टंटबाजी करत आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे हे दोघं आपले कर्तब दाखवण्यासाठी कधी धावत्या ट्रकच्या चाकांजवळ जाऊन उभं राहताहेत तर कधी त्या ट्रकला लटकताहेत.

हा व्हिडीओ आतापर्यंत ८ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर संताप व्यक्त केलाय. जर या मुलांचा अपघात झाला असता तर त्यासाठी जबाबदार कोण होतं? ट्रकवाला की ती मुलं? अशा प्रतिक्रिया देत नेटकरी संताप व्यक्त करताहेत. तसेच अनेकांनी या मुलांना कठोर शिक्षा केली पाहिजे असं आवाहन प्रशासनाला सुद्धा केलं आहे.

हेही वाचा :

नागा चैतन्यच्या साखरपु्ड्यात समंथाची हजेरी…

इचलकरंजीत 16 ऑगस्ट रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने कडकडीत बंद

यंत्रमागधारकांना दिलासा की फसवणूक? महाराष्ट्र सरकारची ऑनलाईन नोंदणी अट शिथिल, परंतु 2025 पर्यंत कायम