परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे एका भोंदूबाबाने मुलाच्या आजारावर जादूटोण्याने उपचार करण्याचे आमिष दाखवून साडेचार लाख रुपये लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (police)आरोपी भोंदूबाबाला अटक केली आहे.
कुकाजी भिमराव मिसाळ असे या आरोपी भोंदूबाबाचे नाव असून तो संत जनाबाई नगर परिसरात राहणाऱ्या माणिक अंगदराव घरजाळे यांच्या मुलाच्या आजारावर उपचार करण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळत होता. अखेर घरजाळे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी जलद कारवाई करत आरोपीला सुलतानपुर येथून अटक केली आहे. त्याला न्यायालयाने 16 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन अशा भोंदूबाबांच्या जाळ्यात अडकणाऱ्या नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
हेही वाचा :
पाण्यासाठी गेली, विनयभंगाची शिकार झाली; सार्वजनिक ठिकाणी तरुणाईची दादागिरी
काँग्रेसचा मोठा निर्णय: नाना पटोलेंच्या नेतृत्वातच आगामी विधानसभा निवडणूक लढवणार
“कायदा प्रकियेचं ज्ञान नसणाऱ्या नानाला लॉटरी एकदाच लागते,” अशोक चव्हाणांचा जोरदार हल्लाबोल