15 ऑगस्ट असणार खास; थार रॉक्ससोबत ओला बाईक होणार लाँच

New Car Launch l 15 ऑगस्ट असणार खास; थार रॉक्ससोबत ओला बाईक होणार लाँच -  Marathi News

यंदाच्या वर्षीचा स्वातंत्र्यदिन ऑटो क्षेत्रासाठी खूप खास असणार आहे. कारण कार(ola) उत्पादक कंपनी महिंद्रा आणि ओला 15 ऑगस्ट रोजी त्यांची वाहने लाँच करणार आहेत. महिंद्रा कंपनी भारतात महिंद्रा थार रॉक्स लॉन्च करणार आहे, तर ओला आपली पहिली इलेक्ट्रिक बाइक बाजारात आणणार आहे.

Mahindra Thar Roxx कार (ola)उद्या लाँच होणार आहे. 15 ऑगस्ट रोजी लाँच होणाऱ्या महिंद्रा थार रॉक्समध्ये तुम्हाला अनेक उत्तम फीचर्स मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला 10.25-इंच ड्युअल स्क्रीन मिळू शकतात. नवीन थारमध्ये दिसणारी स्क्रीन 3-दरवाज्यांच्या मॉडेलपेक्षा मोठी असू शकते. या नवीन थारमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर स्थापित केले जाऊ शकते. नवीन थारमध्ये 360-डिग्री कॅमेरा देखील असण्याची अपेक्षा आहे.

यासोबतच महिंद्रा थार रॉक्समध्ये पॅनोरामिक सनरूफही पाहायला मिळणार आहेत. हे फीचर्स 3-दरवाजा मॉडेलमध्ये देखील समाविष्ट केले गेले नाही. महिंद्राच्या या कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये ADAS लेव्हल 2 फीचर देखील मेटल हार्डटॉप रूफसह बसवले जाणार आहे. XUV700 च्या तुलनेत या SUV मध्ये अधिक आणि नवीनतम फीचर्स समाविष्ट केले जाऊ शकतात.

ओला आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक 15 ऑगस्ट रोजी लाँच करणार आहे, ज्याचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. बाइकचा लूक स्लीक आणि समकालीन आहे. यात साइड पॅनल, सिंगल-सीट कॉन्फिगरेशन, TFT डॅश, ट्विन-पॉड एलईडी हेडलाइट आणि स्पेशल बाईकचे मेकॅनिकल आणि हार्डवेअर स्पेसिफिकेशन्स अजून समोर आलेले नाहीत, पण बाईकमध्ये टेलिस्कोपिक फोर्क सस्पेंशन आहे आणि ती ट्यूबलर फ्रेमच्या आत ठेवली आहे.

भारतीय बाजारपेठेत लाँच केल्यानंतर, अल्ट्राव्हायोलेट F77 मॅच 2 आणि मेटर एरा किंवा एंट्री-लेव्हल रिव्हॉल्ट RV400 आणि टॉर्क क्रॅटोस आरशी स्पर्धा करणार आहे. याशिवाय बाईकमध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क, ट्विन रिअर शॉक ऍब्जॉर्बर आणि दोन्ही टोकांना सिंगल डिस्क आहे.

हेही वाचा :

नागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर आता समंथालाही सापडला ‘द फॅमिली मॅन

भाजी चोरली म्हणून जमावाने भररस्त्यात हातपाय बांधून केली बेदम मारहाण, Video Viral

लाडकी बहीण योजनेचा 27 लाख लाभार्थी महिलांना बसणार धक्का