इचलकरंजी शहरातील केसरी गँगचा गुंड अमोल कामते (वय २४) याला हद्दपार(custody lawyer) असतानाही शहरात परत आल्याने पोलिसांनी दुसऱ्यांदा अटक केली आहे. कामतेने आसरानगर भागात आकाश शिंगारे यांच्या घराबाहेर उभे राहून त्यांना तक्रार मागे घेण्याची धमकी दिली.

माझ्यावर अगोदरच भरपूर केसेस आहेत, माझ्या विरोधात इचलकरंजी(custody lawyer) पोलिस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घे, तक्रार ही खोटी दिली होतीस असे न्यायालयात सांग, अन्यथा अन्य प्रकरणात अडकवून टाकीन तसेच तुला मारून टाकीन, अशी धमकी त्याने शिंगारे याला दिली. याप्रकरणी शिंगारे यांच्या फिर्यादीनुसार अमोल कामते याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली.
यापूर्वीही हद्दीपारीनंतर कामते व चंद्रकांत आळेकट्टी हे दोघे घरात मिळाल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली होती. केसरी गँगवर दोन महिन्यांत झालेली ही दुसरी कारवाई असून, पोलिसांनी गुंडांच्या हलचालींवर बारीक नजर ठेवली आहे.
हेही वाचा :
15 ऑगस्ट असणार खास; थार रॉक्ससोबत ओला बाईक होणार लाँच
नागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर आता समंथालाही सापडला ‘द फॅमिली मॅन
सामान्यांसाठी मोठी खुशखबर! महागाईत आली स्वस्ताई, महागाईचा आगडोंब उसळला