इचलकरंजीतील जादू प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे! तब्बल पाच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर(magic) इचलकरंजी येथे जादूगार जितेंद्र रघुवीर यांचा भव्य शो आयोजित केला जात आहे. होम मिनिस्टर, सुर नवा ध्यास नवा, कॉमेडी एक्सप्रेस, एबीपी माझा कट्टा, चला हवा येऊ द्या यांसारख्या लोकप्रिय शोमध्ये गाजलेल्या जादू प्रयोगांना रसिकांना प्रत्यक्षात पाहण्याची संधी मिळणार आहे.
यूरोप, सिंगापूर, अमेरिकेतून आणलेल्या नवीन जादू (magic)प्रयोगांसह, ९ फुटी जापनीज डायनोसोरही या कार्यक्रमात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात शो पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हा विशेष शो इचलकरंजीच्या ना. बा. घोरपडे नाट्यगृहात स्वातंत्र्य दिनानिमित्त गुरुवारी, १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० वाजता आयोजित केला जाणार आहे. जादू आणि मनोरंजनाचा हा खास अनुभव चुकवू नका!
हेही वाचा :
माहेरहून पैसे न आणल्याने पतीला आला राग; पत्नीला विहिरीत ढकललं अन्…
आले मंत्री मंडळाच्या मना तेथे इच्छुकांचे काही चाले ना
लाडकी बहिण योजनेत महत्वाची अपडेट; देवेंद्र फडणवीस म्हणाले, येत्या 17 तारखेपर्यंत…