विधानसभा निवडणुकीच्या धामधूमीत इचलकरंजीतील विद्यमान(shoulder stretches) आमदार प्रकाश आवाडे यांनी आपल्या मुलाची उमेदवारी जाहीर करून राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. राहुल आवाडे हेच इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, अशी घोषणा प्रकाश आवाडे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. महायुतीला पाठिंबा दिल्यानंतरही त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
प्रकाश आवाडे यांनी कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारसंघात संभ्रम(shoulder stretches) निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यांनी यापूर्वी देखील भाजपला पाठींबा दिल्याचे आणि गेल्या पाच वर्षांत प्रामाणिकपणे त्यांच्या सोबत उभे असल्याचे नमूद केले.
राहुल आवाडे यांच्या उमेदवारीच्या निर्णयामुळे आता कोल्हापूर जिल्ह्यातील दोन प्रमुख मतदारसंघात उमेदवार निश्चित झाले आहेत. प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजीसह हातकणंगले आणि शिरोळमधूनही उमेदवार देण्याचे संकेत दिले आहेत.
हेही वाचा :
“नवरा माझा नवसाचा 2” चित्रपटाचे धमाकेदार टीजर झाले लाँच!
कीमोथेरेपी सुरु असताना परत आले केस! कॅन्सरग्रस्त हिना खानचा आनंद गगनात मावेना
“नवरा माझा नवसाचा 2” चित्रपटाचे धमाकेदार टीजर झाले लाँच!