उत्तर रेल्वे भरती २०२४: ४०९६ रिक्त जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू – जाणून घ्या संपूर्ण तपशील

उत्तर रेल्वेने २०२४ साठी अप्रेंटिस पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी १६ ऑगस्टपासून (online)ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. १६ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येईल. एकूण ४०९६ पदांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना त्यांच्या अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्ज शुल्क, आणि इतर महत्त्वाच्या तपशीलांबाबत जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या अधिसूचनेचा अभ्यास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अर्ज प्रक्रिया:

१. वेबसाइटला भेट द्या: रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC NR) अधिकृत वेबसाइट वर जा.

२. ऑनलाइन अर्ज: होमपेजवर दिलेल्या ऑनलाइन अर्ज लिंकवर क्लिक करून, आवश्यक माहिती भरून अर्ज सादर करा.

३. कागदपत्रे अपलोड करा: सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

४. अर्ज शुल्क भरा: अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करा.

५. प्रिंटआउट घ्या: भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट कॉपी घ्या.

महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज सुरू: १६ ऑगस्ट २०२४
  • अर्ज समाप्ती: १६ सप्टेंबर २०२४
  • गुणवत्ता यादी जाहीर: नोव्हेंबर २०२४

उमेदवारांना यशस्वी अर्ज करण्यासाठी वेबसाइटवरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा :

लाडकी बहीण योजना निवडणुकीनंतर सुरु राहील का? महायुती सरकारमधील मंत्र्यांनी केलं मोठं वक्तव्य

इचलकरंजीतून राहुल आवाडेच उमेदवार! हातकणंगले आणि शिरोळमधूनही……

कीमोथेरेपी सुरु असताना परत आले केस! कॅन्सरग्रस्त हिना खानचा आनंद गगनात मावेना