महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता(scheme) नुकताच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. दरम्यान, एक अचंबीत करणारी घटना समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेची रक्कम एका पुरुषाच्या खात्यात जमा झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या भावाने ना कोणता अर्ज केला होता ना कोणती कागदपत्रे दिली, तरी ती रक्कम त्याच्या खात्यात जमा झाली आहे. जाफर शेख असं पैसे जमा झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्यामुळे नक्की काय घोळ सुरू आहे अशी चर्चा आता रंगली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी अर्ज(scheme)दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होताच कागदपत्राची जुळवाजुळव करण्यासाठी आटापिटा करावा लागला. अखेर स्वातंत्र्यदिनाला दोन हप्त्याचे तीन हजार रुपये बँक खात्यात जमा झाले असल्याचा मेसेज मोबाईलवर आला. रक्षाबंधन पूर्वीच लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाल्याने उत्साहाला पारावार उरला नाही. पण दुसरीकडे अर्ज न करता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम एका पुरुषाच्या खात्यात जमा झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
जाफर शेख सुशिक्षित बेरोजगार आहे. त्याने लाडकी बहीण योजनेसाठी कोणताही अर्ज केला नसताना त्यांच्या बँक ऑफ बडोदाच्या खात्यात योजनेचे तीन हजार रुपये जमा झाले. खात्यात जमा झालेली रक्कम पाहून तो चक्रावून गेला. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांनी दिवसभर रांगेत थांबून अर्ज भरला, कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ केली. मात्र बँक खात्याला आधार लिंक नसल्याने अनेक पात्र महिलांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. दुसरीकडे कोणताही अर्ज न करता एका पुरुषाच्या खात्यात रक्कम जमा झाल्याने प्रशासनाच्या कारभारावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
बँक खात्यात योजनेचे पैसे जमा झाल्यानंतर जाफर शेख म्हणाला सरकारच्या लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होत आहेत. तसाच एक मेसेज माझ्या मोबाईलवर आला आणि माझ्या बँक ऑफ बडोदाच्या खात्यात तीन हजार जमा झाल्याचं समजलं. हे खातं मी २०१२ मध्ये उघडलं होतं. मात्र बँक गावापासून दूर असल्याने व्यवहार करत नाही. मोबाईलवर मेसेज पाहून मी यवतमाळला गेलो आणि बँकेचे स्टेटमेंट घेतलं. त्यानंतर समजलं की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये माझ्या खात्यावर जमा झाले आहेत. मात्र, यासाठी मी कोणताही अर्ज केलेला नाही. कुठेही कागदपत्रे दिली नाही. तरीही हे पैसे कसे जमा झाले याची चौकशी व्हावी असंही जाफर म्हणाला आहे.
हेही वाचा :
अवघ्या काही तासांतच शनी बदलणार चाल! ‘या’ 4 राशी होतील मालामाल…
आईचा विरह असह्य झाल्यामुळं कोल्हापुरात उच्चशिक्षित भाऊ- बहिणीनं संपवलं आयुष्य
पाऊस पुन्हा परतला! आज राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत जोरदार बरसणा