पुणे : हडपसर भागातील एका इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेतील तीन विद्यार्थ्यांनी(school) त्यांच्याच क्लासमधील मुलींचे फोटो टेलिग्रॅम बॉट या अॅपद्वारे मॉर्फ करून ते सोशल मिडीयावर व्हायल केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलं दहावीच्या वर्गात शिकतात. याबाबत एका पिडीत मुलीच्या ३६ वर्षीय आईने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार १६ जून ते ३० जून २०२४ दरम्यान घडला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार यांची मुलगी संबंधित शाळेत (school)दहावीच्या वर्गात शिकते. दरम्यान, ही मुलंदेखील या मुलीच्याच वर्गातील आहेत. तत्पुर्वी त्यांच्या काही मित्र व मैत्रिणींच्या सोशल मिडीयावरील खात्यावर त्यांचे अश्लील फोटो पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले होते. फोटो व्हायरल झाल्याने हा प्रकार समोर आला. पिडीत मुलींनी याची माहिती कुटूंबियांना दिली. त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. चार मुलींचे फोटो मॉर्फ केले होते.
मॉर्फद्वारे नग्न अवस्थेतील फोटो तयार केले होते. दरम्यान, हडपसर पोलिसांनी प्राथमिक तपासात हे फोटो १६ वर्षाच्या मुलाने त्याच्या मोबाईलमध्ये टेलिग्रॅम बॉट या अॅपद्वारे हे फोटो तयार केल्याचे समोर आले. तर, चौकशीत दुसऱ्या दोघांनी ते व्हायरल केल्याचे उघड झाले होते. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन तिघा मुलांना ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक जगदाळे अधिक तपास करीत आहेत.
हडपसरमधील एका शाळेत हा प्रकार घडला असून, मुलांना ताब्यात घेऊन त्यांना बाल न्याय मंडळासमोर हजर केले जाणार आहे. दरम्यान, मुलांचे आई-वडिल शिक्षीत आहेत. मुल चांगल्या शाळेत शिकत असून, या मुलांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पालकांची आहे. त्याबाबत चौकशी करून पालक
हेही वाचा :
पाऊस पुन्हा परतला! आज राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत जोरदार बरसणा
अवघ्या काही तासांतच शनी बदलणार चाल! ‘या’ 4 राशी होतील मालामाल…
अजब सरकारचा गजब कारभार! योजना लाडक्या बहिणीसाठी अन् लाभ झाला भावाला