कधीकाळी बॉलिवूडमध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या रायच्या अफेअरची (discussions)खूप चर्चा असायची. हे दोघे एकमेकांच्या प्रेमात बुडून गेले होते. दरम्यान ऐश्वर्याने अभिषेकसोबत लग्न केलं. त्यांना आराध्या नावाची मुलगी आहे. दुसरीकडे सलमान खान आजही सिंगल आहे. ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांनी सिक्रेट पद्धतीने विवाह केला, अशी चर्चा रंगली होती.
दोघांकडूनही याबद्दल कोणतं स्पष्टीकरण आलं (discussions)नव्हतं. पण लोणावळ्याच्या एका बंगल्यात सोहळा झाला. मुंबईतील एका काझीने निकाह लावून दिला, अशा बातम्या आल्या. ऐश्वर्याने लग्नानंतर मुस्लिम धर्म स्वीकारला. या निकाहवेळी जवळचे लोकं सहभागी झाले होते, अशा अफवादेखील आल्या होत्या.
सलमान खान आणि ऐश्वर्याचे आई वडिल या निकाहवेळी सहभागी झाले नव्हते, असे रिपोर्ट्समध्ये म्हटले गेले होते. यानंतर अशी अफवादेखील पसरली की, निकाहनंतर हे जोडपं हनीमूनसाठी न्यूयॉर्कला गेलं होतं. मुंबईत परतल्यावर त्या दोघांना एकत्र पाहिलं गेल्याचं वृत्त समोर आलं होतं.
ऐश्वर्या रायचे आई वडील हे नेहमीच लेकीच्या सलमान खानसोबतच्या लग्नाविरोधात होते. या अफवांमुळे त्यांना मोठा धक्का बसला होता. तसेच ऐश्वर्या राय ज्या सिनेमांमध्ये मुख्य भूमिकेत होती, त्या निर्मात्यांनादेखील सिनेमाच्या भविष्याची चिंता वाटू लागली होती.
ऐश्वर्या राय आणि सलमान खानच्या सिक्रेट वेडींगची चर्चा सर्व कार्यक्रमांमध्ये होऊ लागली. एका मीडिया टॉकमध्ये ऐश्वर्याने या सर्वावर आपली प्रतिक्रिया दिली. असं असतं तर पूर्ण इंडस्ट्रीला याबद्दल कळालं नसतं का? इंडस्ट्री इतकी छोटी जागा आहे. आईसोबतच्या दुर्घटनेनंतर मला परिवारासोबत वेळ घालवता आला नाही. लग्न करुन गर्वाने जगासमोर घोषणा करेन, अशा लोकांपैकी मी नाही. पण लग्न करायला वेळ कुठेय? असा प्रश्न तिने उपस्थित करत अफवांचे खंडन केले.
सलमान खान आणि ऐश्वर्या रायच्या ब्रेकअपमुळे त्यांच्या फॅन्सना जबर धक्का बसला होता. द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या रायने सलमानसोबत नात्यात असताना आलेल्या अडचणींवर भाष्य केले होते. व्यसनामुळे गैरव्यवहार करण्याची सलमानची सवय सहन करण्यापलीकडे गेली होती. तोंडी, शारीरिक आणि इमोशनल अशा सर्वच बाजुने त्रास, अपमान सहन केला. यामुळे आपण सलमानसोबतच नातं संपल्याचे तिने मुलाखतीत म्हटले होते.
हेही वाचा :
मित्रांनीच केले मैत्रिणींचे न्यूड फोटो व्हायरल; शाळेतील प्रकार
अजब सरकारचा गजब कारभार! योजना लाडक्या बहिणीसाठी अन् लाभ झाला भावाला
पाऊस पुन्हा परतला! आज राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत जोरदार बरसणा