“एका पायावर 10 सेकंद उभं राहणं का आहे आरोग्यासाठी महत्त्वाचं? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत”

आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होणारा ‘एका पायावर 10 सेकंद उभे राहा’ हा ट्रेंड केवळ एक व्यायाम नाही, तर तुमच्या आरोग्याचा (health)मोजमाप करणारा चाचणी आहे, असं डॉक्टरांचे मत आहे. 2022 मध्ये प्रकाशित झालेल्या ब्रिटीश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनच्या अभ्यासानुसार, एका पायावर 10 सेकंद उभे राहण्याची क्षमता दीर्घायुष्याचा अंदाज देऊ शकते.

केअर हॉस्पिटल्स, हैदराबादच्या सल्लागार न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर मुरली कृष्णा यांनी या ट्रेंडच्या आरोग्यदायी फायद्यांवर प्रकाश टाकला आहे. त्यांच्यानुसार, एका पायावर उभं राहण्यासाठी मेंदू आणि शरीरातील विविध प्रणालींचा समन्वय आवश्यक असतो. संतुलन राखण्यासाठी सेरेबेलम, मोटर कॉर्टेक्स, वेस्टिब्युलर सिस्टम, प्रोप्रिओसेप्टिव्ह सिस्टम आणि रिफ्लेक्सेस महत्त्वाचे आहेत.

सर्फिंग, स्केटबोर्डिंग, नृत्य, स्क्वॅट्स, लेग प्रेस, योगासन आणि पिलेट्स हे शरीरातील संतुलन सुधारण्यासाठी उत्तम पर्याय असल्याचं डॉक्टर मुरली कृष्णा सांगतात. या सरावांमुळे मेंदूतील मज्जातंतू कनेक्शन सुधारतं, ज्यामुळे दीर्घायुष्य वाढू शकतं.

तुम्ही हा साधा पण प्रभावी व्यायाम करून पाहा, कारण आरोग्याचं संतुलन राखणं दीर्घायुष्याचं एक महत्त्वाचं घटक ठरू शकतं.

हेही वाचा :

अमोल कोल्हेंचा अजित पवार गटावर तीव्र हल्ला: “शरद पवारांचं बोट सोडलं तर नेता..”

उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्त

आईच्या मद्याच्या आहारी गेलेल्या क्षणात, १३ वर्षीय मुलीवर पित्याचा अत्याचार