उद्धव ठाकरे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री व्हावयाचे आहे?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजवण्यापूर्वीच(Minister) सत्तेवर असलेल्या महायुतीमध्ये तसेच विरोधी महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? या विषयावर चर्चा सुरू झाली आहे. भावी मुख्यमंत्री म्हणून काही नेत्यांचे फलकही त्यांच्या समर्थकांनी लावले आहेत. उद्धव ठाकरे यांना मात्र महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावयाचे आहे आणि म्हणूनच त्यांच्याकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधी जाहीर करा असे आवाहन करण्यात आले आहे.

2019 मध्ये महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे(Minister) यांना दोन अडीच वर्षांमध्येच आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ती सल त्यांच्या मनात अद्यापही ठसठसत आहे. आणि म्हणून त्यांना मुख्यमंत्री पदाचा सन्मान पुन्हा हवा आहे. दोन महिन्यापूर्वी ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी निवडणुकीला सामोरे जाण्याआधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा अशी मागणी केली होती तेव्हा महाविकास आघाडी हाच आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे असे स्पष्ट करून राऊत यांचा”चेहरा”पाडला होता. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला चांगले यश प्राप्त झाले, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.

महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत जे यश मिळालेले आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा करिष्मा महत्त्वाचा फॅक्टर ठरलेला आहे. आणि म्हणूनच आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडूनच मुंबईतील संयुक्त मेळाव्यात गुरुवारी करण्यात आली. भारतीय जनता पक्षाकडून मिळालेल्या अनुभवाला मला पुन्हा सामोरे जावयाचे नाही. असेही त्यांनी म्हटले आहे. यावरूनच मुख्यमंत्री पदाची त्यांची आकांक्षा अप्रत्यक्षपणे पुढे आलेली आहे.

आधी संजय राऊत आणि नंतर दस्तूर खुद्द उद्धव ठाकरे यांच्याकडूनच ही मागणी आल्यामुळे शरद पवार, तसेच नाना पटोले यांची मोठी अडचण झाली आहे. महाविकास आघाडीचे मुख्य नेते म्हणून शरद पवार यांना किंगमेकर व्हावयाचे आहे. त्यामुळेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडणुकीच्या आधी जाहीर होण्याची शक्यता कमी आहे.

विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाले तर मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करायची हे अधिकार शरद पवार यांना स्वतःकडे ठेवावयाचे आहेत. ठाकरे यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आधीच जाहीर केला तर आघाडीची
एकता धोक्यात येऊ शकते. प्रभावीपणे प्रचार होणार नाही, परिणामी आघाडीची ताकद कमी होईल आणि त्याचा फायदा महायुतीला मिळेल. असा राजकीय हिशोब शरद पवार यांनी केलेला असावा. आणि म्हणूनच ते आमची आघाडी हाच आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असे सांगताना दिसतात. उद्धव ठाकरे यांच्या मागणीनंतर त्यांनी किंवा नाना पटोले यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही.

मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा ही उद्धव ठाकरे यांची मागणी हे आवाहन नाही तर आघाडीला खिंडीत गाठण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. राज्यातील अल्पसंख्याक समाज हा माझ्याबरोबर आहे, लोकसभा निवडणुकीत ते सिद्ध झालेले आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरे गटालाच प्राधान्य दिले पाहिजे असा एक अप्रत्यक्ष युक्तिवाद ठाकरे यांच्याकडून केला जातो आहे.

लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठे यश राष्ट्रीय काँग्रेसला मिळालेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी
नाना पटोले, विजय वडेट्टीवार हे दावेदार असू शकतात. शरद पवार यांच्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणीही मुख्यमंत्री झालेला नाही. ही परंपरा त्यांनाही खंडित करावयाची आहे. त्यामुळे ते स्वतःच्या गटासाठी मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरू शकतात.

विधानसभा निवडणुकीत बहुमताच्या जवळपास महाविकास आघाडी आली तर मुख्यमंत्री म्हणून आपल्या नावाचा विचार होणार नाही. किंवा तुम्हाला आम्ही एकदा संधी दिली आहे. त्यामुळे तुम्ही या पदासाठी आग्रह धरू नका असे शरद पवार यांच्याकडूनच सांगितले जाण्याची भीती असल्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी आत्ताच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा ही मागणी लावून धरलेली आहे. त्यांचा दिल्ली दौरा त्याच हेतूने झालेला असावा. त्यामुळे एकूणच महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थ वातावरण आहे.

महायुती मधील काही नेत्यांचे भावी मुख्यमंत्री(Minister) म्हणून फलक लागलेले आहेत. अजित दादा पवार यांना मुख्यमंत्री पदाच्या मांडवाखालून एकदा जायचे आहे. देवेंद्र फडणवीस यांनाही पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावयाचे आहे. एकनाथ शिंदे यांना सुद्धा आणखी किमान दोन वर्षे मुख्यमंत्रीपद हवे आहे. असे एकूण मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात दोन्ही आघाड्यांमध्ये वातावरण आहे.

तथापि महायुतीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला जाणार नाही. निवडणूक निकालानंतर बहुमताच्या जवळपास पोहोचल्यानंतर ज्यांचे जास्त आमदार निवडून आले आहेत त्यांचा मुख्यमंत्री असा फार्मूला पुढे येईल. महायुतीचा मुख्यमंत्री असेल असे देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी सांगितले असले तरी भारतीय जनता पक्षाला राज्याचे नेतृत्व करायचे आहे हे लपून राहिलेले नाही.

हेही वाचा :

“यशाच्या शोधात IAS पदाचा त्याग: गौरव कौशलच्या ध्येयवादी प्रवासाची कथा”

शिवसेना चिन्ह प्रकरण: सुनावणी पुन्हा लांबणीवर, निकाल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर येण्याची शक्यता

राहुल द्रविडचा पोरगाही क्रिकेटमध्ये करणार धमाका.., डिव्हिलियर्ससारख्या स्फोटक शैलीत