पत्नीसोबत अनैतिक संबंधाचा संशय, मित्रानेच मित्राला संपवलं; गोणीत गुंडाळून झुडपात फेकलं

नवी मुंबईत पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून आपल्या मित्राची (friend)हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. उरणमधील जासई गावात दि.बा. पाटील सभागृहाशेजारी असलेल्या झाडाझूडपात पांढऱ्या गोणीत एक मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवत तात्काळ तपासाला सुरुवात केली होती.

पत्नीसोबत अनैतिक संबंधाचा संशय
याबाबत सविस्तर वृत्त असं की, दत्तात्रय घुटुकडे, असं मृताचे नाव असून त्याचा मित्र (friend) आरोपी बालगंधर्व गोरड याने त्याची हत्या केल्याचं निष्पन्न झालंय. बालगंधर्व आणि दत्तात्रय एकाच ट्रान्सपोर्ट कंपनीत कामाला होते. बालगंधर्व याला दत्तात्रयचे आपल्या पत्नी सोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या संशयातून त्याने दत्तात्रयला आपल्या घरी दारू पिण्यास बोलावले होते.

मित्राचा खून केला
दारूची नशा चढल्यावर बालगंधर्वने दत्तात्रयच्या डोक्यात दगड टाकून हत्या केली होती. यावेळी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने आपली पत्नी वैशालीला मदत करण्यास भाग पाडले होते. उरण पोलीसांनी गुन्हा दाखल करत बालगंधर्व गोरड आणि वैशाली गोरड या दोघांना अटक केलीय. यासंदर्भात अधिक तपास सुरु आहे. पत्नीसोबतच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून धक्कादायक पाऊल उचलल्याचं समोर आलंय.

मृतदेह झुडपात फेकला
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं अन् तरूणानं थेट मित्रालाच संपवल्याची घटना नवी मुंबईत घडली. मित्राचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध आहे, या संशयातून तरूणाने मित्राला जिवे मारल्याची घटना उरणमध्ये घडली. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. मृतदेह गोणीत आढळल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती. गोणीत गुंडाळून आरोपींनी मृतदेह झुडपात फेकून दिला होता.

हेही वाचा :

लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी!

वाहन चालवताना चालकाला हृदयविकाराचा झटका, गाडीवरील नियंत्रण सुटलं अन्…

‘अजित पवारांबरोबर नाईलाजाने…; ‘या’ आमदारांच्या वक्तव्यांने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण