‘विराट कोहली कर्णधार नसला तरी…’, बुमराहचं मोठं विधान, ‘रोहित फार कठोर…’

भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराहने विराट कोहली (captain)आणि रोहित शर्माच्या नेतृत्वावर भाष्य केलं आहे. यावेळी त्याने विराट कोहली आज कर्णधारपदी नसला तरी लीडर आहे असं म्हटलं आहे.

भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराहने(captain) विराट कोहली आणि रोहित शर्माच्या नेतृत्वावर भाष्य केलं आहे. यावेळी त्याने विराट कोहली आज कर्णधारपदी नसला तरी लीडर आहे असं म्हटलं आहे. तसंच रोहित शर्माच्या नेतृत्वावर भाष्य केलं आहे. यावेळी त्याने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात सर्वात सुरक्षित भावना निर्माण झाली असंही सांगितलं.

भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडूंचा जेव्हा कधी उल्लेख केला जाईल तेव्हा त्यात बुमराहच्या नावाचा नेहमी उल्लेख असेल. भारतीय संघाला फार वर्षांनंतर इतका सश्रम गोलंदाज सापडला आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती झाली आहे. बुमराहच्या गोलंदाजीची धार कायम ठेवण्यासाठी बीसीसीआयने त्याच्यावरील वर्कलोड कमी केला आहे. त्याला प्रत्येक मालिकेत खेळवण्याचा अट्टाहस नसून, विश्रांती देण्यात आली आहे.

बुमराहने भारतीय संघात पदार्पण केले तेव्हा महेंद्र सिंह धोनी कर्णधार होता. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत बुमरहाने धोनीमुळे आपल्याला करिअरच्या सुरुवातीला फार मदत झाली असं सांगितलं. “धोनीने मला फार सुरक्षित भावना दिली. संघात आल्यानंतर त्याने लगेच मला सुरक्षित वाटू दिले. त्याला त्याच्या इन्स्टिक्ट वर फार विश्वास आहे. त्याला प्लॅनिंग करणे पटत नाही,” असा खुलासा बुमराहने केला.

धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहलीला कर्णधार करण्यात आलं होतं. विराट कोहलीने सर्व प्रकारात भारतीय संघाचं नेतृत्व केले. “तो प्रचंड उत्साही, ऊर्जेने भरलेला आहे. तो मनात काही ठेवत नाही. त्याने फिटनेसला प्राधान्य दिले आणि त्याप्रकारे संघ तयार केला. आता विराट कोहली कर्णधारपदी नसला तरी तो लीडर आहे. कर्णधार हे फक्त एक पद आहे, पण संघ 11 खेळाडू चालवतात,” असं जसप्रीत बुमराहला म्हणाला.

बुमरहाने यावेळी रोहित शर्माचं कौतुक करताना त्याला गोलंदाजांच्या भावना कळतात असं म्हटलं. “फलंदाज असूनही गोलंदाजांप्रती सहानुभूती बाळगणाऱ्या मोजक्या कर्णधारांपैकी रोहित शर्मा एक आहे. त्याला खेळाडूंच्या भावना कळतात, आणि खेळाडू कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे त्याला ठाऊक आहे. रोहित कठोर नाही, तो अभिप्रायासाठी तयार असतो,” असं तो म्हणाला.

हेही वाचा :

दुर्दैवी! भरधाव बसची पिकअपला जोरदार धडक; रक्षाबंधनाला निघालेल्या १० मजुरांचा मृत्यू

पत्नीसोबत अनैतिक संबंधाचा संशय, मित्रानेच मित्राला संपवलं; गोणीत गुंडाळून झुडपात फेकलं

लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी!