“बॉयफ्रेंडसोबत फिरायला..”; कोलकाता प्रकरणावर ‘या’ खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

कोलकाता येथे ट्रेनी डॉक्टरवर (doctor)झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी देशभरातून विरोध करण्यात आला. मोर्चे काढण्यात आले. तर, विरोधी पक्षाकडून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी देशभरातील डॉक्टर्स रस्त्यावर उतरले. अजूनही डॉक्टर्स आंदोलन करत आहेत. अशात तृणमूलच्या एका खासदाराने वादग्रस्त विधान केलं आहे. यामुळे संताप व्यक्त केला जातोय.

तृणमूल काँग्रेसचे खासदार अरुप चक्रवर्ती यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, खासदार अरुप चक्रवर्ती यांनी आंदोलन आणि संप करणाऱ्या डॉक्टरांवर(doctor) टीका केली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे डॉक्टरांकडून संताप व्यक्त केला जातोय.

पश्चिम बंगाल येथे एका रॅली दरम्यान, खासदार अरुप चक्रवर्ती म्हणाले की, “आंदोलनाच्या नावाखाली तुम्ही घरी जाऊ शकता. तुमच्या बॉयफ्रेंडसोबत फिरायला जाऊ शकता. तुमच्या संपामुळे एखादा रुग्ण हॉस्पिटलमध्ये दगावला आणि लोक तुमच्यावर संतापले तर आम्ही तुम्हाला वाचवणार नाही.”

अरुप चक्रवर्ती यांच्या या वक्तव्यावर आता विरोधी पक्षाकडूनही विरोध केला जातोय. पुढे रॅलीनंतर माध्यम प्रतिनिधींनी त्यांना या वक्तव्याबद्दल विचारले असता ते आपल्या विधानावर ठाम राहिले. “संपाच्या नावाखाली रुग्णांना उपचार मिळाले नाहीत तर त्यांचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे संप करणाऱ्या डॉक्टरांवर लोकांना राग येईल आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांना वाचवू शकणार नाही.”, असं अरुप चक्रवर्ती म्हणाले.

दरम्यान, स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आर. जी कर कॉलेजमध्ये काही गुंडांनी संपावर असलेल्या डॉक्टरांवर हल्ला केल्याची माहिती आहे. तसेच, त्यांनी आपत्कालीन विभागाची तोडफोड देखील केली होती.

कोलकाता येथील आर.जी कर मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात एका डॉक्टरची अत्यंत क्रूर पद्धतीने बलात्कार करून हत्या करण्यात आली. तिच्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. या घटनेचा देशभरातून निषेध केला जात आहे. या घटनेवरुन देशभरातले डॉक्टर हे त्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत.

हेही वाचा :

राजकारणाच्या वाटेवर मनोज जरांगे पाटील….!

महत्वाची बातमी! आज ‘या’ जिल्ह्यांत आज पाऊस धुमाकूळ घालणार

अय्यर दिसताच पैसे मागू लागली गरीब महिला; कारमध्ये बसला अन्…-VIDEO