बदलापूर : बदलापूरमध्ये झालेल्या अत्याचारामुळे मोठा रोष व्यक्त केला जात(police) आहे. मागील तीन तासांपेक्षा अधिक काळ बदलापूर रेल्वे रुळावर लोकांकडून आंदोलन केले जात आहे. अवघ्या 4 वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. पीडित मुलीच्या पालकांनी तक्रार केल्यानंतर 12 तासांनंतरही कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती.
शाळेमध्ये देखील भोंगळ कारभार असल्याचे समोर आले आहे. यामुळे आंदोलक आक्रमक(police) झाले आहे. आता बदलापूरच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर मोठी दगडफेकी केली आहे. तर पोलिसांकडून आंदोलन शांत करण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत.
शाळेंच्या मुलींवर झालेल्या या अत्याचारामुळे बदलापूरमधील नागरिक आक्रमक झाले आहे. रेल्वे स्थानकासह रस्त्यांवर उतरुन लोक रोष व्यक्त करत आहेत. लोकांमध्ये रागाची भावना असून नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. बदलापूरमधील संबंधित शाळेची देखील संतप्त जमावाने तोडफोड केली आहे.
मोठ्या प्रमाणात आंदोलक रेल्वेच्या रुळावर आंदोलन करत आहे. त्यांना नियंत्रित करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर संतप्त जमावाने दगडफेक केली. आंदोलक माघार घेत नसल्यामुळे पोलिसांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. रुळावरील दगड मोठ्या प्रमाणात पोलिसांवर फेकण्यात आले. त्यानंतर पोलीस रुळावरुन बाहेर पडले. यामध्ये तीन ते चार पोलीस जखमी झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
बदलापूरच्या रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणात आंदोलक जमले आहेत. रास्ता रोको करण्यात आला असून घोषणाबाजी करण्यात येत आहे. अत्याचार प्रकरणामुळे बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था खोळंबली आहे.
रस्त्यावरचा जमाव माघार घेत नसल्यामुळे पोलिसांनी अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. यामुळे आंदोलकांची पांगापांग झाली. बदलापूरमध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती असून यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर लक्ष ठेवून आहेत.
हेही वाचा :
राजकारणाच्या वाटेवर मनोज जरांगे पाटील….!
अय्यर दिसताच पैसे मागू लागली गरीब महिला; कारमध्ये बसला अन्…-VIDEO
“बॉयफ्रेंडसोबत फिरायला..”; कोलकाता प्रकरणावर ‘या’ खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य