एम एस धोनीचा देसी अंदाज, मित्रांसोबत ढाब्यावर मोकळ्या आकाशाखाली केली पार्टी Photo

भारताचा माजी कर्णधार एम एस धोनीची फॅन फॉलोईंग (friends)तगडी आहे. 15 ऑगस्ट 2020 रोजी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. भारताला तब्बल दोन वर्ल्ड कप जिंकवून देणारा धोनी त्याच्या साधेपणासाठी सुद्धा ओळखला जातो. सध्या धोनीचा त्याच्या मित्रांसोबत पार्टी करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात धोनी आपल्या काही मित्रमंडळींसोबत मोकळ्या आकाशाखाली एका साध्या ढाब्यावर पार्टी करताना दिसतोय.

धोनी त्याच्या देसी अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. कमालीची फॅन फॉलोईंग(friends) आणि आर्थिक दृष्ट्या समृद्ध असताना सुद्धा धोनीने त्याच्या मातीशी नाळ घट्ट जोडून ठेवलेली आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर धोनी रांची शहरापासून लांब असणाऱ्या अनेक एकरच्या फार्म हाऊसवर जैविक शेती करतो. क्रिकेटमध्ये एवढं मोठं नावं मिळवूनही धोनी आपल्या जुन्या मित्रांना अजूनही विसरलेला नाही. तो अनेकदा त्यांच्या घरी जाताना त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसतो.

धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात धोनी आपल्या जुन्या मित्रांसोबत ढाब्यावर पार्टी करताना दिसत आहे. यात धोनी सोबत 14 जण एकाच टेबलवर बसून जेवणाचा आनंद घेतायत. तर धोनीने यावेळी त्याच्या लहान फॅन्स सोबतही फोटो काढला. धोनीचा मित्रांसोबतचा हा फोटो व्हायरल होत असून नेटकरी धोनीच्या साधेपणाचं कौतुक करत आहेत.

एम एस धोनी हा भारताचा असा कर्णधार आहे ज्याच्या नेतृत्वात भारताने तब्बल तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. विकेटकीपर आणि फलंदाज धोनीने 2014 मध्ये टेस्ट क्रिकेटमधून तर 2020 मध्ये वनडे आणि टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. धोनीने भारताच्या नेतृत्वात 2007 मध्ये टी 20 वर्ल्ड कप, 2011 मध्ये वनडे वर्ल्ड कप तर 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. धोनीने त्याच्या कारकिर्दीत एकूण 90 टेस्ट, 350 वनडे सामने तर 98 टी 20 सामने खेळले आहेत.

हेही वाचा :

“बॉयफ्रेंडसोबत फिरायला..”; कोलकाता प्रकरणावर ‘या’ खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

अय्यर दिसताच पैसे मागू लागली गरीब महिला; कारमध्ये बसला अन्…-VIDEO

बदलापूर आंदोलन चिघळलं! पोलिसांवर दगडफेक तर पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या