रत्नागिरीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यक्रमाकडे भाजपची पाठ; महायुतीत तणाव वाढला

22 ऑगस्ट 2024: मुख्यमंत्री (minister)एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रत्नागिरी शहरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला, मात्र या कार्यक्रमाकडे भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली. भाजप नेते रवींद्र चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटाचे रामदास कदम यांच्यातील वादामुळे महायुतीतील तणाव वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह भाजपचे कोणतेही नेते उपस्थित राहिले नाहीत, ज्यामुळे सत्ताधारी महायुतीत वाद उफाळल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते, परंतु भाजपच्या नेत्यांनी त्यात सहभाग टाळला.

कार्यक्रमासाठी रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एसटी बस रत्नागिरीत आणल्याने या तिन्ही जिल्ह्यांतील ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने या परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा:

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढविण्यासाठी राज्य सरकारला केंद्राची साथ: शिवराज सिंह चौहान

वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

‘माझी लाडकी बहीण’ योजनेला कोणाचाही डोळा लागणार नाही – मुख्यमंत्री शिंदे यांचा इशारा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कार्यक्रमाला अनुपस्थित राहिलेल्या काही बचत गटांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महायुतीतील या तणावामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.